आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाणेकरांना १९ जूनपर्यंत अंतरिम जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अ‍ॅड.नीलेश घाणेकरांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी फेटाळून लावला. मात्र, उच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतरिम जामीन दिला.

घाणेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला होता. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. राजेंद्र मुगदिया यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. मुगदिया यांनी अटकपूर्व जामिनास विरोध केला. आरोपीच्या मोबाइल कॉल्सचे डिटेल्स तपासायचे आहेत. आरोपीला जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील असा युक्तिवाद केला. आरोपीतर्फे अ‍ॅड. आर. एस. देशमुख यांनी युक्तिवाद केला की, तपासासाठी मज्जाव केलेला नाही.

सरकार पक्षाने मांडलेल्या मुद्यावरून आरोपीच्या पोलिस कोठडीची आवश्यकता वाटत नाही. युक्तिवाद ऐकून सत्र न्यायाधीश आर.आर.काकाणी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला. घाणेकरांतर्फे अ‍ॅड. आर. एस. घाणेकर यांनी या आदेशाविरुद्ध दाद मागायची असून आरोपी मे पासून दुसर्‍या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याला अंतरिम जामीन द्यावा, असा अर्ज केला. त्यास मुगदियांनी विरोध केला.