आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advance Laundry Unit At Government Civil Hospital

घाटी रुग्णालयात अत्याधुनिक लाँड्री युनिट झाले सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटीमध्ये एक अत्याधुनिक लाँड्री युनिट सुरू झाले असून दुसरे युनिट येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे. दोन्ही युनिटमुळे घाटीतील एक हजारपेक्षा जास्त कपड्यांची रोज धुलाई होणार आहे. कॅन्सर हॉस्पिटलमध्येही स्वतंत्र लाँड्री युनिट सुरू होणार आहे.

घाटीत यापूर्वीही लाँड्री युनिट होते. मात्र यातील उपकरणे जुनी झाली. नवीन युनिट पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच सजिर्कल बिल्डिंगमधील वॉर्ड क्रमांक 14 समोर सुरू झाले आहे. या युनिटमध्ये कपडे धुण्यासाठी 100 किलो व 60 किलोंची क्षमता असलेल्या दोन वॉशिंग मशीन आहेत. तसेच रक्ताचे, औषधांचे डाग काढण्यासाठी खास 50 किलोंची क्षमता असलेले तिसरे वॉशिंग मशीनही युनिटमध्ये उपलब्ध झाले आहे. कपडे धुण्यासाठी लागणारे गरम पाणी ‘इलेक्ट्रिक स्टीम बॉयलर मशीन’द्वारे मिळणार असून कपड्यांतील पाणी पिळून काढण्यासाठी हायड्रो मशीन, तर कपडे वाळवण्यासाठी ड्रायर मशीनही युनिटमध्ये नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे.

कपड्यांवर इस्त्री करण्यासाठी तीन आयर्निंग मशीन आणि तीन ट्रालीजही युनिटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. अशीच उपकरणे इतर दोन युनिटमध्येही असतील. पूर्वीच्या युनिटमध्ये ड्रायर, आयर्निंग मशीन नव्हते. पावसाळ्यात कपडे वाळवण्याचा प्रश्न असतो. मात्र नवीन उपकरणांमुळे हा प्रश्न राहणार नाही. इस्त्री करण्यामुळे काही प्रमाणात निर्जंतुकीकरण होऊ शकते. त्याचबरोबर नवीन वॉशिंग मशीनची क्षमताही वाढवण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी सांगितले.

सर्व उपकरणे 78 लाखांची
प्रत्येक युनिटसाठी 26 लाख म्हणजेच तिन्ही युनिटची सर्व उपकरणे 78 लाखांची आहेत. घाटीतील सर्व 30 वॉर्डांतील 600 बेडशीट, तर सर्व शस्त्रक्रियागृह (ओटी) व प्रसूती कक्षातील 400 कपडे असे दररोज सुमारे एक हजारपेक्षा जास्त कपडे रुग्णालयात धुण्याची आवश्यकता असते. ही दररोजची धुलाई दोन लाँड्री युनिटद्वारे होऊ शकते, असेही डॉ. गट्टाणी यांनी सांगितले.