आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहसी उपक्रमांमधून मिळाला आत्मविश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनालीमध्ये केलेली ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॉक रॅप्लिंग तसेच झोरबिंग अशा वैविध्यपूर्ण साहस उपक्रमांतून एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच आयुष्याची अविस्मरणीय सफर अनुभवल्याची संधी शिबिराच्या माध्यमातून मिळाल्याची प्रतिक्रिया साहसी शिबिरात सहभागी 45 विद्यार्थ्यांनी दिली.

नागपूर येथील सीएसी ऑलराउंडर या संस्थेने साहसी शिबिरांचे आयोजन केले होते. त्यात विविध शाळांतील 10 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अशा प्रकारच्या साहसी शिबिरात औरंगाबादेतून पहिल्यांदाच विद्यार्थी जात असल्याने पालकांच्या आणि शिबिरार्थींच्या मनात प्रचंड उत्सुकता, भीती अशा संमिर्श भावना होत्या, पण 10 दिवसांच्या या शिबिरातून परतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आमूलाग्र असल्याचे पालकांनी सांगितले.

धाडस निर्माण करण्यासाठी मोठा फायदा झाला

या शिबिरात मुद्दाम मुलीला पाठविले. कारण काही अनुभव असे असतात जे आपण शिकवू शकत नाही. ते स्वत: अनुभवायचे असतात. यातून धाडस वाढते. एकट्याने राहताना स्वत:ची आणि आपल्या वस्तूंची काळजी घेण्याची जबाबदारी वाढते. - गणेश शहाणे, पालक

मुले या शिबिराला जाऊन आल्यापासून त्यांच्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. जबाबदारीने वागणे आणि विशेष म्हणजे इतरांशी जुळवून घेण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचा अनुभव येत आहे.’’ प्रतिमा मंत्री

झोरबिंग करताना सर्वाधिक मजा लुटता आली. चेंडूमध्ये दोघांनी बसायचे आणि नंतर त्याला ढकलून दिले जात होते. आतमध्ये आम्ही सगळे गडबडत होतो. मजा आली. रात्रीच्या फायर कॅम्पमध्येही सर्वांनी खूप छान सादरीकरण केले. - र्शेयस मंत्री
शिबिराच्या निमित्ताने शहरात साहस शिबिरांना सुरुवात झाली आहे. मुलांना या प्रकारचे अनुभवही आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. येणार्‍या काळात आपल्या शहरातील मुलांसाठी अशा पद्धतीचे लहान लहान शिबिरांचे आयोजनही आम्ही करू.’’ अमोल खंते, आयोजक

माझ्या दोन्ही मुलींना मी या शिबिराला पाठविले होते. यामुळे त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झाले. येणार्‍या काळात हा अनुभव त्यांच्या आयुष्याच्या शिदोरीला मोलाचा ठरेल.’’ गोपीचंद वासवाणी

शिबिराला जाण्यापूर्वीच मी खूप उत्साही होतो. तिथे गेल्यावर आम्ही सर्वांनी खूप मजा केली. मी सर्वात लहान असल्याने सर्वांनी माझी खूप काळजी सुद्धा घेतली. ’’ - पार्थ ज्ञानी

4शिबिराची सुरुवातच अप्रतिम झाली. विमान प्रवास आमच्यापैकी अनेकांसाठी प्रथमच होता. शिवाय प्रत्येक दिवशी नवे साहस होते. सर्वच प्रकार आम्ही पहिल्यांदा करत असल्याने आनंद, मजा, भीती अशा भावना मनात होत्या.’’ - प्रत्युष मोरे

रिव्हर राफ्टिंगचा अनुभव थ्रिलिंग होता. कारण अत्यंत थंड पाणी आणि सतत हलणारी बोट हे फक्त टीव्हीत पाहिले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना पहिल्यांदा भीती होती, पण नंतर मजा आली.’’ वैष्णवी घुगे

या शिबिरातील माझा मुलगा सर्वात लहान वयाचा होता. त्यामुळे मला फ ार काळजी वाटत होती. कधीही मला सोडून तो राहिलेला नव्हता आणि विशेष म्हणजे तिथे त्याला वेगवेगळे साहस उपक्रम करायचे होते. - सविता ज्ञानी

आम्ही 17 मुली शिबिरात होतो. काही जणी खूप धीट होत्या तर काही घाबरायच्या. मात्र आम्ही सर्वांनी एकमेकांना धीर देत प्रत्येक साहस पूर्ण केले. केल्यानंतर आमच्यात आत्मविश्वास वाढला एवढे नक्की. पुढच्या वर्षी पुन्हा शिबिराला जाऊ.’’ - गायत्री शहाणेमुलांना अशा पद्धतीच्या शिबिराचा अनुभव देण्यासाठी मी स्वत: सर्व चौकशी केली. मुलांना घेऊन गेलो. पुस्तकी शिक्षणाशिवाय आयुष्यात प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊ शकलो याचा आनंद आहे.’’ महेश भावसार, आयोजक