आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्रा एमआयडीसीमध्ये ‘पंचतारांकित’अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदपथदिवे, बीएसएनएलची बेभरवशाची लाइन. परिणामी दिवसदिवस फोन आणि इंटरनेट बंद असते. ट्रक टर्मिनल नाही. दुसरीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न. एवढेच नव्हे, तर कुठल्याही उद्योगाला अत्यावश्यक असणाऱ्या विजेचीही कायमची बोंब... या कोणत्याही गावातील अडचणी नाहीत, तर औद्योगिक वसाहतीचे हे दु:ख.. विशेष म्हणजे पंचतारांकित सुविधांचा दावा असलेल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये या पंचतारांकित अडचणी असल्याने संबंधित विभागांचे कोणते ‘उद्योग' सुरू आहेत, हेच स्पष्ट होते.

वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. ही घोषणा सत्यात उतरवण्यासाठी लघु उद्योजकांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील उद्योजकांना मूलभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मेक इन महाराष्ट्रचा नारा बुलंद करण्यापेक्षा किमान मूलभूत सेवा देण्याचा सरकारने विचार करावा म्हणजे आपोआपच मेक इन महाराष्ट्रला बळ मिळेल.

एमआयडीसीशी संपर्क नाही, नंबरही चुकीचे: शेंद्राएमआयडीसीतील या सर्व अडचणींबाबत एमआयडीसीची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी चमूने एमआयडीसीचे विभागीय कार्यालय गाठले. पण कोणीही भेटले नाही. दुसरीकडे विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावरही संपर्क साधला; ९८२२७९४६७६ हा मोबाइल क्रमांकही चक्क चुकीचा टाकण्यात आला आहे.

विजेच्या लपंडावामुळे त्रस्त
येथील बहुतांश उद्योग हे प्राेसेस इंडस्ट्री प्रकारात मोडणारे असल्यामुळे २४ तास वीज आवश्यक आहे. धातू वितळववण्यासाठीची यंत्रे ७०० ते १००० डिग्री सेल्सियसवर चालवावी लागतात. वीज गेली तर ही यंत्रे बंद पडतात. लघु उद्योगांना स्वतंत्र जनरेटर बसवणे शक्य होत नाही. त्यामुळे महावितरणवरच अवलंबून राहावे लागते. येथे एमएसईबीचे पावर हाऊस आणि सबस्टेशन आहे. नियमाप्रमाणे एखाद्या वेळी विजेचे काम सुरू असेल तर सबस्टेशनहून कंपन्यांना तशी पूर्वकल्पना दिली जाते; पण पावसाळा सुरू झाल्यापासून येथे सांगताच वीज गायब होत आहे. यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत.

तक्रारीनंतर 3 तास अंधार
सबस्टेशनवर एक जणच तैनात असतो. वीज गेल्यावर हा कर्मचारी तांत्रिक कामातील तज्ज्ञ नसल्याने तो औरंगाबादेतील संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती देतो. ते आणखी २-३ जणांची जुळवाजुळव करत शेंद्र्यात पोहोचतात. आल्यावर फॉल्ट शोधणे आणि मग दुरुस्ती यात 3 तास जातात.

उद्योजकांना भुर्दंड
- वीज गेली तरी बर्नर आणि ब्लोअरसारख्या मशिन्स सुरू ठेवाव्या लागतात. मग उद्योजकांची जनरेटरसाठी धावपळ सुरू हाेते. शंेद्र्यात जनरेटर भाड्याने देणारे ते खासगी
ठेकेदार आहेत.

- एक तास सर्व यंत्रे चालवण्यासाठी २० लिटर म्हणजेच सुमारे १२०० रुपयांचे डिझेल लागते.

- एक तास मर्यादित यंत्र चालवण्यासाठी १५ लिटर म्हणजेच सुमारे ९०० रुपयांचे डिझेल लागते.

- जनरेटरला एक तासासाठी १००० रुपये भाडे लागते.

- स्वत:चे जनरेटर घेण्यासाठी किमान साडेसात ते आठ लाख रुपये खर्च येतो.

याआहेत पंचतारांकित अडचणी
- शेंद्रा औद्योगिक वसाहतीला पंचतारांकित दर्जा आहे. पण येथील अडचणी बघितल्या तर या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

- बीएसएनएलची बोंब-शेंद्र्यात केवळ बीएसएनएलची लँडलाइन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध
आहे. याच्या तारा भूमिगत आहेत. थोडे खोदकाम केले तरी त्या तारा तुटतात आणि सेवा
ठप्प होते.

- पथदिवे बंदच- सेक्टर हे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राखीव आहे; परंतु येथील एकही पथदिवा कधीच सुरू झालेला नाही. रात्री काळाकुट्ट अंधार पसरतो.

- ट्रक टर्मिनल नाही-उद्योजकांना मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकची गरज पडते. येथे ट्रक
टर्मिनल नसल्याने मोठी गैरसोय होते. उद्योजकांना वाळूजहून ट्रक बोलवाव्या
लागतात.

एमआयडीसीच्या धोरणाप्रमाणे परदेशी कंपन्यांना अनेक प्रकारच्या करात सूट आहे. पण आम्हाला नियमित कर भरावे लागतात. कर आम्ही भरतो; परंतु सुविधा त्यांना मिळते. हा भेदभाव दूर होणे गरजेचे आहे -परिसरातीललघु उद्योजक

याभागात काही तक्रारी होत्या; पण १५ दिवसांपूर्वी मेंटेनन्सची कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर इथल्या समस्या दूर झाल्या आहेत. आता हवा किंवा पावसात वीज जाणार नाही. प्रकाशवाहुळे, सहायक अभियंता, महावितरण

सध्याकुठलेही नवीन कनेक्शन देणे बंद केले आहे. या भागासाठी केवळ ३० लाइनची क्षमता होती. ती पूर्ण झाली आहे. नवीन लाइन देण्याची क्षमता वाढावी म्हणून प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच या भागात नवीन कनेक्शनही देता येईल. -जी. एम. इंगळे, सब डिव्हिजनल इंजिनिअर, बीएसएनएल
हेच का मेक इन इंडिया
सरकार मेक इन इंडियाची घोषणा करून मोकळी झाली. पण पंचतारांकित म्हणवल्या जाणाऱ्या आणि कधीकाळी आशियातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणाऱ्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत मूलभूत सुविधाही नाहीत. त्यामुळे हेच का मेक इन इंडिया, हा प्रश्न पडतो. परिसरातीललघु उद्योजक
अशी गेली वीज
जून २०१५ : रात्री८:१५ ते ९:५०
जून२०१५:रात्री १२:३०ते पहाटे ३:३०
जून२०१५ : सायंकाळी५.३० ते ६:१५
१३जून २०१५ : रात्री३० मिनिटे
२४जून २०१५ : सकाळीतास