आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून सिनेमागृहांत मालमत्ता कराची जाहिरात, सिनेमा सुरू होण्यापूर्वी; मध्यंतरात झळकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारपासून शहरातील सर्वच्या सर्व सिनेमागृहांत कर भरणा करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती झळकणार आहेत. सिनेमा सुरू होण्यापूर्वी आणि मध्यंतरात अशा दोन वेळा या जाहिराती दाखवल्या जातील. यासाठी मनपाला कोणताही खर्च लागणार नाही. जाहिराती मोफत दाखवण्याची तयारी सिनेमागृह चालकांनी दर्शवली आहे.
 
आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशावरून करमूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी बुधवारी शहरातील सिनेमागृह चालक तसेच वाॅर्डाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सिनेमागृह चालकांनी कर वसुलीत सहकार्य करावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. तेव्हा सिनेमागृह चालकांनी तशी तयारी दर्शवली आणि अगदी मोफत मनपाच्या जाहिराती दाखवण्यासाठी सिनेमागृह चालक समोर आले. गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत नि:शुल्क अशा जाहिराती शहरातील सर्व सिनेमागृहांत झळकणार आहेत. 

यासाठी उचलले पाऊल
नोटाबंदीच्याकाळात नागरिकांनी मालमत्ता करापोटी जवळपास १८ कोटी रुपये भरले. ही रक्कम साधारणपणे मार्चअखेर मनपाच्या तिजोरीत जमा होते. ती आधीच जमा झाल्याने मार्चमध्ये मनपाकडे जमा होणाऱ्या कराचे प्रमाण कमी आले आहे. दुसरीकडे लाख हजार मालमत्ताधारकांपैकी लाख २० हजार नागरिकांनी कर भरलेला नाही. त्यांनी कर भरावा यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. कर भरला नाही तर मनपा काय कारवाई करू शकते, त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतील, याबाबतची माहिती सिनेमागृहांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीत असणार आहे. 

...तर पूर्ण कर भरल्याशिवाय सुटका नाही
व्यावसायिकमालमत्ता सील करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मालमत्ता सील केली तर टप्पे पाडून दिले जाणार नाहीत. पूर्ण थकबाकी, तीही दोन टक्के दरमहा व्याजाने भरावी लागेल. त्याआधीच कर भरण्याची तयारी दाखवली तरच टप्पे पाडून दिले जाऊ शकतात. 

खर्चामुळे बँड नाहीच 
अन्यनगर परिषदा तसेच महानगरपालिकांंप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने कर वसुलीसाठी मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या घरासमोर बँड वाजवले नाहीत. बँडसाठी येणारा खर्च हा थकबाकीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याने बँड वाजवण्यात आला नाही. बँड पथकातील एका व्यक्तीला एका तासासाठी दीड हजार रुपये द्यावे लागतात. पथकात चार जण असतील तर एका तासासाठी सहा हजार रुपये मोजावे लागतात. एवढी रक्कम देऊन थकबाकीदाराने पाच हजार रुपये जमा केले तर ते आतबट्ट्याचेच ठरणार होते. त्यामुळेच वसुली अधिकाऱ्यांनी यंदा बँड पथक लावण्याचा निर्णय घेतला होता. 
बातम्या आणखी आहेत...