आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक मशिदीचा बाधित भाग दोन दिवसांत काढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘विशिष्ट धर्मीयांचीच प्रार्थना स्थळे पाडली जाताहेत’ असा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन केला होता. त्यानंतर गुरुवारी मुस्लिम नगरसेवकांनीही आयुक्तांची भेट घेऊन शिवसेना भाजपच्या दबावाखाली आयुक्त ही कारवाई करत असल्याची तक्रार केली. ‘ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. त्यात कोणाचा दबाव नाही की पक्षपातीपणा नाही’ असे स्पष्ट करतानाच क्रांती चौक येथील कदीम मशिदीच्या बाधित जागेचे भूसंपादन झाले असून दोन दिवसांनंतर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. 

पालिकेचे पथक बुधवारी क्रांती चौक येथील मशिदीचा बाधित भाग पाडण्यासाठी गेले होते. परंतु जमावाने विरोध केला. ही मशीद संरक्षित असताना पालिकेचे अधिकारी तेथे गेलेच कसे, असा सवाल नगरसेवकांनी आयुक्तांना केला. या मशिदीच्या ठिकाणचा रस्ता ७० फूट ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ताबा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. या वेळी विरोधी पक्षनेते फेरोज खान, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, काँग्रेस नगरसेवक अफसर खान, अजीम खान, रफत यार खान, अय्युब जहागीरदार, अब्दुल रहिम नाईकवाडी, अश्फाक कुरेशी, अहेमद शेख, सायरा बानो, ए. टी. शेख आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...