आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 4 महिन्यांनंतर स्वत:ला घेतले जाळून! आत्महत्येपूर्वी भावाला फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्नानंतर बोळवणीच्या वेळी नवरदेवाकडील मंडळीला महागडे कपडे का घेतले नाही म्हणून सतत छळ होत असल्याने अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या तरुणीने स्वत: पेटवून घेऊन या जगाचाच निरोप घेतला. ही घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास कैलासनगर भागात घडली. उमा नंदकिशोर सपकाळ २९ असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली अाहे. आज मृताचा भाऊ मृतदेह घेण्यासाठी शहरात आला असता, तिने त्याच्यासोबत आदल्या रात्री मोबाइलमध्ये रेकाॅर्ड केलेला संवाद पोलिसांना ऐकवला आणि प्रकरण किती गंभीर आहे याची सत्यता उजेडात आली.

भल्या पहाटे उमाने स्वतःला पेटवून घेतले आणि ती जोरात ओरडली. तिच्या खोलीतून आवाज कानी पडताच घरातील सगळे तिच्या दिशेने धावले. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने तो तोडण्यात आला. उमा पूर्णपणे आगीच्या विळख्यात होती. कशीबशी आग विझविण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उमा हिला तातडीने घाटीत दाखल केले. पहाटे साडेपाच वाजता तिचा मृत्यू झाला. सपकाळ कुटुंबीयांनी घडलेला प्रकार उमाच्या माहेरी कळवला. तिचे वडील आणि भाऊ घाटीत आले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तो तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. ते मृतदेह घेऊन सेलूकडे रवाना झाले. तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे करत आहेत. उमाच्या भावाने अद्याप तक्रार दिलेली नाही.
भाऊ, दादाला नीट बोलायला सांग
रविवारी रात्री आत्महत्येच्या एक दिवस अगोदर उमाने भावाला फोन केला होता. दादाला म्हणजे वडिलांना माझ्या घरचे फोन करणार आहे. त्यांना नीट बोलायला सांग ते रेकॉर्ड करणार आहे, असे ती विनवत होती.

तीन हजारांचा ड्रेस दिला नाही म्हणून महिनाभर माहेरी बोलणे बंद होते
उमा ही मूळची परभणी जिल्ह्यातील सेलू या गावची. १५ मे २०१६ रोजी तीचे नंदकिशोर सोबत लग्न झाले होते. तो सराफा भागातील एका कपड्याच्या दुकानावर कामाला आहे. लग्नानंतर बोळवणीमध्ये सासरच्या सगळ्या मंडळींना तीन हजारांचा ड्रेस घेतला नाही. म्हणून तीला एक महीना माहेरच्या मंडळीशी बोलू दिले नव्हते. असे उमाच्या भावाने सांगितले. उमाचा एक भाऊ शिक्षक असून वडील सेलू येथील एका शाळेत लिपिक आहेत.

बहीण भावाचे फोनवरील संभाषण...
*उमा : भाऊतू कुठे आहेस
*भाऊ: बोलमी घराच्या बाहेर चौकात आहे बोल
*उमा : भाऊमाझ्या घरचे दादांना फोन करणार आहे. त्यांना नीट बोलायला सांग
*भाऊ : नेमकंकाय झालं, नीट सांग
*उमा : माझ्यानवऱ्याची माफी माग म्हणे, मागच्या वेळी त्यांना अरेतुरे केले होते. म्हणून माफी मागा म्हणे, मला फोनवर बोलू देत नाही. मी इकडे भांडे घासण्यासाठी आले म्हणून बोलू शकत आहे. दादाला सांगशील रे भाऊ.
*भाऊ : तुलामारतेत का त्रास देतेत
*उमा: (रडतरडत) नाही रे भाऊ नाही
*भाऊ: यायचंका उद्या परवा घ्यायला
*उमा : नकोनको, दिवाळीला घ्यायला ये पण ते फोन करतील तेव्हाच ये, भाऊ दादाला अरे तुरे बोलू नका म्हणा, कोणाचाही फोन येऊ दे. ते रेकॉर्ड करणार आहे. आम्ही पोरीवाले नाही पोरावाले आहे असे म्हटले ते.. ते आपलीच चूक दाखवतात.
*भाऊ: तुलात्रास व्हायला का गं ? मी येतो तुला घ्यायला
*उमा : नकोनको, मी ठेवते भांडे घासायचे ते येतील पुन्हा, ठेवते भाऊ.
बातम्या आणखी आहेत...