आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या खंडानंतर मराठवाड्यातील अनेक जिल्‍ह्यात पाऊस परतला, पिकांना जीवदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुमारे दीड महिन्यांच्या खंडानंतर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. औरंगाबादसह हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांत सोमवारी दुपारनंतर हलका ते मध्यमस्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा अल्पाधीत येणाऱ्या पिकांना फारसा लाभ होणार नसला तरी कापूस, तूर, ज्वारी, सूर्यफुल या पिकांना जीवदान मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात दुपारी १२ नंतर  सर्वदूर दमदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत आणि औंढा नागनाथ या पाचही तालुक्यांत मध्यम पाऊस झाला आहे. हिंगोली शहर आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांनंतर  दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास प्रथमच सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला.   सायंकाळी ६ वाजेनंतरही रिमझिम पाऊस सुरूच होता.  सेनगाव आणि औंढा नागनाथ येथेही पावसाला सुरुवात झाली.  कळमनुरी आणि वसमत तालुक्यात दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  या पावसामुळे पिकांना पुढील किमान १५ दिवसांसाठी जीवदान मिळाले आहे.  

जालना जिल्ह्यात हलक्या सरी : जालना जिल्ह्यात  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला  काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.  शहर व परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास  हलक्या सरी बरसल्या. मंठ्यात दुपारनंतर भिज पावसाने हजेरी लावली. जाफराबाद शहर व परिसरात हलका पाऊस झाला.  परतूरमध्ये काही वेळ पाऊस झाला.

जिल्ह्यात मध्यम पाऊस : सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान बीड शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली.  वडवणी, शिरुर तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम  पाऊस झाला.
 
पुढील स्‍लाइडवर... साहेब..तुम्हीच आमच्या व्यथा सरकारसमोर मांडा, दिवाकर रावते यांच्याकडे शेतकऱ्यांची विनंती
 
बातम्या आणखी आहेत...