आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Beating The Tractor For Students, Tuition For When The Accident Happened.

ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थ्याचा अंत, शिकवणीसाठी जाताना घडला अपघात.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-हडको एम-2 मध्ये शिकवणीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्याच्या दुचाकीला मनपाच्या कचरा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने बुधवारी पहाटे 5.30 वाजता जोराची धडक दिली. यात प्रसाद विजय नारखेडे (18, साफल्य हाउसिंग सोसायटी, सिडको एन-8) याचा गुरुवारी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रसाद हा शिवछत्रपती महाविद्यालयात बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होता. दुचाकी (एमएच 20 बीएम 9684 ) घेऊन ट्यूशनकडे तो निघाला होता. शांतिनिकेतन शाळेसमोर आल्यानंतर ट्रॅक्टरने त्याला जोराची धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या भागातील रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी यांनी सहकार्‍याच्या मदतीने त्याला तातडीने अँपेक्स रुग्णालयात दाखल केले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रसादच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. प्रसाद हा एकुलता एक होता. प्रसादवर गुरुवारी सायंकाळी सिडको एन-6 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.