आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता गेल्यानंतर काँग्रेसला सर्व देव आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सत्ता गेल्यानंतर प्रथमच काँग्रेसला सर्व देव आठवले आहेत. राज्यात आणखी जोरदार पाऊस व्हावा, शेतकऱ्यांची गरिबी दूर व्हावी यासाठी मंगळवारपासून काँग्रेसचे कार्यकर्ते मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्चमध्ये जाऊन देवाला साकडे घालणार आहेत. प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देवाला साकडे घालण्याचे वेळापत्रक जाहीर केले.
शेतकऱ्यांसाठी सर्व देवांचा धावा काँग्रेसकडून केला जाणार आहे. मंगळवारपासून काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक देवाला साकडे घालण्यासाठी बाहेर पडणार आहेत. सध्या गणराय विराजमान असल्याने याची सुरुवात गणपतीला आरती करून केली जाणार असून मंगळवारी दुपारी १२ वाजता संस्थान गणपती येथे महाआरती करून या अभियानाची सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पवन डोंगरे, मनोज पाटील उपस्थित होते.

असे आहे नियोजन
>मंगळवार- दुपारी१२ वाजता संस्थान गणपती, राजाबाजार येथे महाआरती
>बुधवार-सायंकाळीवाजता गुरुद्वारा, उस्मानपुरा येथे अरदास
>गुरुवार-सकाळी१० वाजता, महावीर भवन, कुंभारवाडा येथे अभिवादन, दुपारी १२ वाजता बुद्धलेणी येथे बुद्धपूजा.
>शुक्रवार-सकाळी१० वाजता शहानूरमियां दर्गा येथे चादर चढवणार
>रविवार-सकाळी१० वाजता छावणी चर्च येथे प्रार्थना.