आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीनंतर टीव्ही सेंटर ते हडको कॉर्नर रस्त्याचे काम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टीव्ही सेंटर ते हडको कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूने सिमेंटचे रस्ते तयार करण्यात येणार आहे. एका बाजूचा रस्ता निम्मा तयार असून दुसऱ्या रस्त्याचे काम मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच बंद पडले होते. वर्दळीच्या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात "दिव्य मराठी'ने पाठपुरावा केल्याने हे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.
तीन महिन्यांपासून या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला होता. त्यात दीड महिन्यात टीव्ही सेंटर चौक ते अण्णाभाऊ साठे चौकाचे काम करण्यात आले. दुसऱ्या बाजूचे काम करण्यासाठी चौकातच रस्त्यावर माती टाकण्यात आली होती. त्यामुळे एकाबाजूने तयार झालेल्या निम्म्या रस्त्यावरून सगळी वाहतूक सुरू होती. नादुरुस्त रस्त्याचा मधूनच वापर होत असला तरी पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. सर्व वाहतूक एकाच रस्त्यावरून जाण्याऱ्या -येणाऱ्या वाहनांची गर्दी होत आहे. टीव्ही सेंटर चौकात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असून भाजीमंडई, रुग्णालये, क्लासेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. तसेच रस्त्यावरही फळविक्रेत्यांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
यासंदर्भात रस्त्याचे काम बंद का आहे? कधी सुरू होणार? याची माहिती घेऊन "दिव्य मराठी'ने पाठपुरावा केला. त्यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दोन महिन्यांत काम सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र हे काम अवघ्या एका महिन्यातच सुरू करण्यात आले आहे.
अडचण येणार
टीव्ही सेंटर ते हडको कॉर्नरपर्यंतचा रस्ता एका बाजूने अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. टीव्ही सेंटर ते अण्णाभाऊ चौकापर्यंत हे काम होण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वेळेवर पाऊस पडणार असल्याने कामात अडसर येण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...