आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यासाठीच केली होती श्रीगणेशाची भक्ती? म्हणून आग्रह असतो वापरा ‘माती’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  हे दृश्य आहे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानात असलेल्या गणेश विसर्जन विहिरीतले. दोन दिवसांपूर्वीच शहरातल्या शेकडो गणेशमूर्तींचे या विहिरीत विसर्जन करण्यात आले. ज्या मूर्ती मातीच्या होत्या त्या पाण्यात विरघळून गेल्या; पण प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींची अशी दुरवस्था झाली. भंगलेल्या आणि विद्रूप झालेल्या अवस्थेत या विहिरीत अशा अनेक मूर्ती पडल्या असून गुरुवारी हे छायाचित्र टिपले आहे अरुण तळेकर यांनी. 
 
म्हणून आग्रह असतो वापरा ‘माती’ 
दहा दिवस नितांत भक्तिभावाने ज्यांची पूजा होते त्या श्री गणेशाच्या मूर्तींची अशी विटंबना होऊ नये म्हणून ‘दिव्य मराठी’ मातीची मूर्ती स्थापन करण्याचा सातत्याने आग्रह करीत आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम वाढत असला तरी अजूनही पीओपीच्या मूर्तीही वापरल्या जातात आणि नंतर त्यांची अशी विटंबना होते. हे केव्हा थांबेल? 
 
 
बातम्या आणखी आहेत...