आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After June Water Rate Increases In State, Maharashtra Water Regulator Authority Decision

राज्यातील पाणीदरात जूननंतर होणार वाढ,महाराष्‍ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील पाणीदरात जूननंतर वाढ होणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष बुद्धिराज यांनी शनिवारी वाल्मी येथे झालेल्या जनसुनावणीच्या वेळी दिले. अमरावती, नागपूर, नाशिक व औरंगाबादेत ही सुनावणी झाली. पुणे, मुंबईच्या जनसुनावणीनंतर दरवाढ निश्चित करण्यात येईल. पाणीदराच्या निश्चितीसाठी मसुदा जाहीर करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाकडून धरणाच्या माध्यमातून शेती, घरगुती आणि उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. दर तीन वर्षांनी प्राधिकरणाकडून पाणीदर ठरवले जातात. 2013-2016 या तीन वर्षांसाठी नवीन दर लागू राहतील. राज्याच्या एकात्मिक जलआराखड्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याचे प्राधिकरणाच्या सदस्य चित्कला झुत्सी यांनी सांगितले. सुनावणीस उद्योग आणि महापालिकेचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकात्मिक जल आराखड्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून, गोदावरी खो-याचा आराखडा तयार केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
प्रदुषित पाण्यासाठी उद्योगांचे पाणी बंद
प्रदूषित पाणी नदीत सोडणा-या उद्योगांना तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. नंतर अशा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाचे एस. सोडल यांनी दिला. यापूर्वी उद्योजकांना केवळ दंड केला जात होता.