आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगातून सुटताच चाकू हल्ला करत 3 लाख लुटले, डॉ. टाकळकरांना धमकावणाऱ्याने तयार केली टोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नऊ महिन्यांपूर्वी शहरातील त्वचारोगतज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या विष्णू सानपने तुरुंगातून सुटल्यावर एमआयडीसी वाळूज येथे १६ नोव्हेंबर रोजी एका ठेकेदारावर चाकूहल्ला करत दोन लाख ९५ हजार रुपये लुटले होते. त्याला त्याच्या टोळीतील तिघांना वाळूज एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक करत लाख ७५ हजार रुपये जप्त केले.

 

सतीश पांडुरंग चव्हाण (१९, रा. जय भवानीनगर वडगाव कोल्हाटी), महेश भाऊसाहेब वेताळ (२०, रा. रांजणगाव शेणपुंजी) एका अल्पवयीन मुलाचा टोळीत समावेश आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १६ नोव्हेंबर रोजी अजिंक्य इंटरप्रायझेसचे कर्मचारी दीपक रत्नाकर तौर (२८) कामगारांच्या वेतनाचे दोन लाख ९५ हजार रुपये घेऊन दुचाकीवरून जात असताना मराठवाडा ऑटो कंपनीच्या मागील मोकळ्या जागेवर सानप यांच्या टोळीने त्यांना लुटले होते. तौर आणि इतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी सुरु केला. तेव्हा संशयित वाळूज परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना जेरबंद केले, असे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, हवालदार वसंत शेळके, कारभारी देवरे, प्रकाश गायकवाड मनमाहेनमुरली कोळीमी, बंडू गोरे, सुधीर सोनवणे यांचा समावेश होता.

 

वीस हजारांसाठी हल्ला
अवघ्या२० हजार रुपयांसाठी चव्हाण, वेताळ आणि त्याचा साथीदार चाकू हल्ल्यास तयार झाला. विष्णूने अल्पवयीन आरोपीला २०, चव्हाण, वेताळला ३२ हजार रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. टाकळकर खंडणी प्रकरणात विष्णू सहा महिने तुरुंगात होता. तेथून जामिनावर सुटताच त्याने टोळी तयार केली.

 

बातम्या आणखी आहेत...