आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- शाळेत ये-जा करण्यासाठी असलेला रस्ता अडवल्यामुळे  उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.

देवळाणा रमाईनगर वस्तीवरील विद्यार्थ्यांना वस्तीवरून शाळेवर जाण्या-येण्याचा रस्ता अडवला असल्याने वस्तीवरील विद्यार्थ्यांसह पालक सुरेश बनकर, चंद्रकांत बनकर, सुनीता गायकवाड, नैना मोरे, कडूबा  मोरे, यशपाल बनकर, अक्षय मोरे यांच्यासह विद्यार्थी शाळेच्या रस्त्यासाठी सोमवार, १७ जुलै रोजी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.  रस्ता मोकळा करून दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात अाला होता. याची दखल प्रशांत बंब घेतली. त्यांच्या निर्देशावरून उपसभापती दिनेश अंभोरे, तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली. 

तहसीलदार जऱ्हाड यांनी विषय तत्काळ मार्गी लावण्यात येईल व येत्या २० जुलै रोजी हा विषय तहसील कार्यालयात सुनावणीसाठी ठेवण्यात येईल.  सुनावणीच्या दिवशी रस्त्यासंबंधी निर्णय पारित करण्यात येईल, असे लेखी पत्र   दिले. माजी उपसभापती अंभोरे व तहसीलदारांनी  दिलेल्या आश्वासनानंतर पँथर्सचे राजअनंत यांनी विद्यार्थ्यांसह पालकांचे उपोषण मागे घेतले.  नायब तहसीलदार हरणे, अन्ना बनकर,  सुभाष गायकवाड, किशोर जाधव, विकास घाटे, हुसनोद्दीन पटेल, सिद्धार्थ बनकर, कैलास बनकर, प्रकाश वाकळे उपस्थित होते. 
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...