आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The Tomorrow If Not Helmets 600 Rs. Penalty

परवापासून हेल्मेट नसेल तर ६०० रु. दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन दिवसांनंतर शहरात हेल्मेट सक्ती सुरू होत असून हेल्मेट घालणाऱ्या दुचाकी चालकांकडून ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे, असे पोलिस आयुक्तांनी जाहीर केले होते. त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन शहरातील एमआयटी, एमजीएम, सरस्वती भुवन अशा ४० टक्के महाविद्यालयांनी पुढाकार घेतला आहे. जे विद्यार्थी आणि कर्मचारी हेल्मेटचा वापर करतील त्यांनाच महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये वाहने लावता येणार आहेत. या सक्तीमुळे चालकांना हेल्मेटची सवय होईल, असे ते म्हणाले.