आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशाऱ्यानंतरही ड्रायव्हर सीटशेजारी विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -शाळांतील मुला-मुलींना ड्रायव्हर सीटशेजारी बसवल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी चार दिवसांपूर्वी दिला; परंतु तरीही शहरातील शालेय वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांतील चित्र बदललेले नाही. सोमवारी "दिव्य मराठी'च्या चमूने शहरातील विविध भागांत पाहणी केली असता रिक्षा, मिनडिोरमध्ये ड्रायव्हरशेजारी मुली-मुले बसल्याचे आढळले.

काय म्हणतात, पालक, शिक्षक
विश्वास टाकावा लागतो

शाळा घराजवळ असल्याने स्वत:च सोडायला जाते; परंतु काम असेल तर इतरांवरही विश्वास ठेवावा लागतो. एक आई म्हणून शाळेबरोबरच माझीही जबाबदारी आहे.
-स्वाती मारवाडे, पालक
रिक्षाचालकांना सूचना
रिक्षाने जाणाऱ्या सर्व पाल्यांच्या पालकांनी रिक्षाचालकांना धूम्रपान करू नका, मुलांना शेजारी न बसवता मागे बसवा, रिक्षाबाहेर मुलांचा तोल जाऊ नये म्हणून जाळ्या बसवा, आदी सूचना केल्या आहेत.
-राजश्री पोहेकर, पालक
मुलींनाही सूचना
कितीही धावपळ असली तरी मुलींना शाळेच्या वाहनात बसवेपर्यंत सोबत असते. मुलींनाही काय काळजी घ्यावी, याबद्दल सूचना केल्या आहेत. काही अडचण असल्यास शिक्षकांशी बोलावे, असे त्यांना सांगितले आहे.
-संध्या मोहिते, पालक
पालकांनाही सूचना
मुलांना रिक्षातील मागच्या सीटवर बसवण्याचे सांगितले आहे. तसेच रिक्षाचालकाचे नाव, पत्ता, त्यांच्या वाहन परवान्याची तपासणी आम्ही केली आहे. रिक्षाचालकांची एक बैठक घेऊन सूचना केल्या आहेत.
-आर. बी. चव्हाण, शिक्षक, सोनामाता विद्यालय.
पालकांनी तक्रार केली तर गुन्हा
}मुलींना ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसवणाऱ्या रिक्षाचालकांवर त्या मुलीच्या किंवा पालकांच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
मोटार व्हेइकल अॅ क्‍ट काय म्हणतो?
-मोटार व्हेइकल अॅ क्‍टनुसार प्रवाशाला ड्रायव्हर सीटवर बसवून गाडी चालवणाऱ्या चालकाला केवळ १०० रुपयाचा दंड आहे. तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या रिक्षाचालकालादेखील नियमानुसार १०० रुपयांचा दंड आहे. जास्तीत जास्त त्याचे परमिट जप्त करण्याचा धाक पोलिस दाखवतात. मात्र असे फार कमी वेळेस होते. त्यामुळे रिक्षाचालक बिनधास्त वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शालेय वाहतूक करत असतात.