आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील आणखी 3 शेतकऱ्यांची आत्महत्या; कर्जाबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नापिकी आणि कर्जामुळे मराठवाड्यातील ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. उस्मानाबादचे दोघे तर हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मृतात समावेश आहे.

हिंगोलीत र्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या 
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत कुरुंदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागोराव गणपतराव दळवी (६५) असे मृताचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी दळवी यांनी कजर्बाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यांना विष्णुपुरी, नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुरूममध्य विष प्राशन
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शेतकरी हणमंत सायबन्ना मुदकन्ना  (४४) यांनी   विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजता घडली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी हातउसने घेतलेले पैसे परत देता येत नसल्याने नैराश्यात त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. कमी शेती असलेले शेतकरी हणमंत सायबन्ना मुदकन्ना हे शहरातील एका खासगी फायनान्समध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. त्यांनी हातउसने पैसे घेतले होते.

वालवड येथील शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या
वालवड- भूम तालुक्यातील वालवड येथील एका शेतकऱ्याने पेटवून घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आजिनाथ विठोबा पाडुळे (६०) यांनी आपल्या पत्नीला शेजारच्या खोलीत कोंडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.  पत्नीने आेरडून लोकांना बोलावल्यामुळे जमलेल्या नागरिकांनी आग विझवून सोलापूरला नेले. घरातील दिवाण, टीव्ही, कपड्यांनाही आग लागल्यामुळे पाडुळे ७० टक्के होरपळले. उपचार घेताना दुपारी दोनला त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या केल्याचे समजते.त्यांच्या पश्च्यात दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...