औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयात हॉटेल परवान्यासाठी ५०० रुपयांएेवजी ४० हजार ते लाख रुपये दलालांमार्फत वसूल केले जात असल्याचे वृत्त "दवि्य मराठी'ने २३ जुलैच्या अंकात प्रकाशित करताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. "ते' दलाल कोण आणि संबंधित क्लार्क, अधिकारी, पोलिस कर्मचारी यांचीही चौकशी सुरू झाली आहे.
पोलिस आयुक्तालयात ५०० रुपयांच्या हाॅटेल परवान्यासाठी ४० हजार ते लाख रुपये वसूल करून परवाना देण्यासाठी दलालांच्या माध्यमातून कसा गैरव्यवहार चालतो, पैशांची मागणी कशी होते, याचे सविस्तर वृत्त "दवि्य मराठी’त प्रकशित झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. रात्री ११ वाजेनंतर चालणाऱ्या खानावळी, बिअर बार, रेस्टॉरंट, हॉटेलांवर १९ जून रोजी छापे टाकण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत जेमतेम १० टक्के बिअर बार, हॉटेलचालकांकडे परवाना असल्याचे निदर्शनास आले होते. १५ दविसांत पोलिस परवाना घ्यावा, असे आदेश त्यांना देण्यात आले होते. यासाठी आयुक्तालयात दलालांनी लूट सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.
"त्या' कर्मचाऱ्यांची गय नाही
- पोलिसआयुक्तालयातील काही कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी सुरू आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. असे प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. अमितेश कुमार, पोलिसआयुक्त