आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कत्तलखान्याविरोधात बिडकीनमध्ये निदर्शने, जनसेवा मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - परिसरात कत्तलखाना होऊ नये यासाठी जनसेवा मित्रमंडळ व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी बसस्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होऊ देणार नाही, असा पवित्रा सरपंच अशोक धर्मे यांनी घेतला आहे.
बिडकीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट नंबर ९२५ मध्ये मे. पार्क इंटरनॅशनल फूड्स प्रा. लि. व आर.एम.एल. फूड्स स्टाफ प्रा. लि. या कंपन्यांचा कत्तलखाना बिडकीन येथे होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने १९ मे २०१४ रोजी कंपन्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. ही बातमी ग्रामस्थामध्ये पोहाेचल्यानंतर सर्वत्र ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त झाला. तसेच ग्रामस्थांनी निदर्शने केली. त्यानंतर १३ जुलै २०१४ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन कत्तलखान्यासाठी दोन्ही कंपन्यांना दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. दरम्यान १ जून रोजी कंपनीचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे. ठराव ग्रामसभेद्वारे रद्द झाला तर भूमिपूजन कसे, याबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
तेव्हा जनसेवा मित्रमंडळाचे कैलास जाधव, योगेश औटी, अनिल कोथंबिरे, अशोक हिवाळे, विकास चव्हाण, गणेश देशमाने, लक्ष्मण वाघमारे, संतोष वैद्य, संदीप गायकवाड, बंडू शेटे, राजू गायकवाड यांनी कत्तलखान्याच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी तलाठी संतोष बिरुटे यांना निवेदन देण्यात आले. यात कत्तलखाना झाल्यास या परिसरातील जमीन, पाण्याची नासाडी होईल. तसेच ग्रामस्थांचेही आरोग्य धोक्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
होऊ देणार नाही
^हा ठराव माझ्या कारकीर्दीमध्ये झालेला नाही. मी सरपंचपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीचा हा प्रश्न आहे. मी जनमताचा आदर करतो. माझी व ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका कत्तलखान्याच्या विरोधात आहे. १३ जुलै रोजी ग्रामसभेमध्ये नाहरकत प्रमाणपत्र रद्द केल्याचा ठराव व या ठिकाणी कत्तलखाना होऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी, नगररचना कार्यालय यांना देण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयात जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत बिडकीन येथे कत्तलखाना होऊ देणार नाही.
अशोक धर्मे, सरपंच
बातम्या आणखी आहेत...