आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन - दुचाकी वाहनधारक पोलिस ठाण्यातच उभी करणार वाहने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातील जळीत वाहनांचा आलेख वाढत आहे. चार वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रकरणाची पोलिस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप सोशल मीडियाच्या आधारे होत आहे. इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्यात यशस्वी ठरणारे पोलिस वाहन जळीत प्रकरणातच का अपयशी ठरत आहेत? की या प्रकरणात पोलिसांतच कोणी ‘घरभेदी’ आहे? अशा आशयाची पोस्ट सध्या बजाजनगर परिसरातून फेसबुक व व्हाॅट्सअॅपद्वारे हजारोंपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियाचा आधार घेत सर्वसामान्य कामगार नागरिकांना संघटित करून ‘रहिवासी नागरिकांचे वाहन थेट पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात येतील.’ या अनोख्या पद्धतीने येत्या गुरुवारी जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पोलिस प्रशासनाला दिला.

२९ जानेवारी २०१० पासून बजाजनगरात दुचाकी व चारचाकी वाहन जाळण्याचे सत्र सुरू झाले. वाहन जळीत प्रकरणी पोलिसांनी दोन टोळ्या पकडल्या. मात्र, त्यानंतरही वाहन जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून माथेफिरू १५० सिसी व त्यापेक्षा अधिक सिसीची वाहने एकाच रात्रीतून भस्मसात करत असल्यामुळे ‘बजाजनगरातील वाहन जळीत प्रकरण’ जिल्हाभरामध्ये चर्चेचा विषयय बनला आहे. आतापर्यंत १२७ वाहने भस्मसात झाली आहेत. सोशल मीडियावर १२ जानेवारी २०१५ रोजी यासंदर्भात त्यांनी पोस्ट टाकली आली आहे. या पोस्टला फेसबुकवर ५७ लाइक व १८ कमेंट आल्या आहेत. त्यासोबतच सदरील पोस्ट ‘व्हाॅट्सअॅप’वरूनही झळकताना िदसत आहे.
जनआंदोलन छेडण्यात येणार
-रात्रीत पाच ठिकाणी वाहने जाळून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिस का अपयशी ठरत आहेत? आता वाहन उभा करण्यासाठी केवळ पोलिस ठाणे हीच एकमेव सुरक्षित जागा शिल्लक राहिल्यामुळे त्या ठिकाणी गुरुवारी (२२ जानेवारी) अनोख्या पद्धतीचे सर्वसामान्य नागरिकांचे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.
नितीन देशमुख, संस्थापक, स्वराज्य प्रतिष्ठान

नागरिकांचे सहकार्य हवे
-पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नुकतेच बजाजनगर परिसरामध्ये ५० हजार ‘दक्ष नागरिक’चे पाँप्लेट वाटप करण्यात आले आहेत. रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांतून सकारात्मक सहकार्य मिळाले तर नक्कीच वाहन जाळणाऱ्या आरोपीला पकडण्यात यशस्वी होऊत.
इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक