आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agnerd People Fire Motor Car Issue At Aurangabad

पाच तासांत पाच वाहने भस्मसात; माथेफिरू सीसीटीव्हीत कैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगर परिसरात माथेफिरूने पुन्हा एकाच रात्रीत विविध भागांतील ५ वाहने जाळून भस्मसात केली. सीमेन्स हाउसिंग सोसायटीतील पहिले वाहन रविवारी मध्यरात्री १२ वाजता, तर शेवटचे वाहन पहाटे ५ वाजता पेटवून दिल्याची घटना घडली. एकाच रात्रीतून पाच वाहने जळाल्याने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह पथकाने घटनास्थळांची पाहणी केली.

दोघे असल्याचा संशय
पहिले वाहन जाळून इंद्रप्रस्थ कॉलनी या बजाजनगरच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलेल्या माथेफिरूच्या हालचाली लगतच्या शर्मा कॉम्प्युटर क्लासेसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामध्ये माथेफिरू १२ वाजून २५ मिनिटाला परिसरात दाखल झाला. दोन मिनिटे घुटमळला व बरोबर १२ वाजून २७ मिनिटे ४२ सेकंद या वेळेला तो वाहन जाळण्यासाठी धावला. त्याने अंगात काळ्या रंगाची पँट व शर्ट घातलेला आहे. शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेल्या आहेत. दोन भागांत घडलेल्या जळीत प्रकरणावरून पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे की, संबंधित सहकाऱ्याच्या मदतीने दुचाकीवरून येऊन वाहन पेटवून पळ काढतो.दरम्यान, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे फौजदार अजयकुमार पांडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू