आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभापती औताडे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध आणलेल्या विश्वास प्रस्तावावर भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही. यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची पुन्हा एकदा हार झाली आहे. ज्या १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी एकही हजर राहिला नाही. गणपूर्ती नसल्याने अविश्वास ठराव बारगळल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी घोषित केले. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले.
आठ वर्षांनंतर यंदा बाजार समितीवर लोकनियुक्त १८ सदस्यांची निवड झाली. मात्र, काँग्रेस भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि भाजपचे फुलंब्रीचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले. भाजपने काँग्रेसचे गणेश दहीहंडे यांना फोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसने भाजपचे बंडखोर पण अपक्ष निवडणूक लढवून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले संजय औताडे विकास दांडगे यांना आपल्या गोटात ओढले. यामुळे समान दोन्हीकडे ९-९ सदस्य संख्या झाली. शेवटी चिठ्ठी पद्धतीने ऑगस्ट २०१५ रोजी औताडे यांना सभापती पदाची लॉटरी लागली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या काँग्रेसचे तीन, व्यापारी मतदार संघाचे दोन सदस्यांना सोबत घेऊन भाजपने अविश्वासाचा ठराव दाखल केला, पण तो यशस्वी करण्यात अपयश आले.

अशी पडली सर्व प्रक्रिया पार : १२सदस्यांनी २२ सप्टेंबर रोजी सभापती औताडेंिवरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव ठेवला. २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची नियुक्ती केली होती.
बातम्या आणखी आहेत...