आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने तारले, शासनाच्या वांझ बियाण्याने मारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सलग तीन वर्षे दुष्काळाच्या छायेत असलेला जिल्ह्यातला बाजरी उत्पादक शेतकरी या वर्षी नव्याच संकटात सापडला आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागामार्फत बाजरीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. मात्र, ही बाजरी पिकलीच नाही. पाखराने टोकरलेल्या कणसाप्रमाणे बाजरीला कणसे लागली आहेत. काही कणसे पूर्णपणे वांझ तर काही कणसांमध्ये तुरळक दाणे भरल्याने शेतकऱ्यांनी उभ्या बाजरीमध्ये जनावरे सोडली आहेत. या वाणाची उत्पादनक्षमता कमी आहे, हे माहिती असूनदेखील कृषी विभागाने जिल्ह्यामध्ये आठ हजार एकरांवर हे ‘वांझ’पणाचे प्रात्यक्षिक केले, हे विशेष!
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सलग तीन वर्षे दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना केला. सुुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन या केंद्र शासनाच्या कंपनीने आरएचबी-१७७ हे वाण विकसित केलेले आहे. या वाणाची उत्पादकता कमी असली तरी कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये हे वाण उपयोगी पडेल, असा कंपनीचा दावा होता. त्यामुळे कृषी विभागाने या वर्षी या वाणाचे प्रात्यक्षिक थेट शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्याचे ठरवले अन् त्यातून जिल्ह्यातील आठ हजार एकरांवर या वाणाची पेरणी केली. पण सलग तीन वर्षांच्या दुष्काळातून सावरण्याऐवजी या बियाण्याने शेतकऱ्यांना आणखीनच खड्ड्यात लोटले आहे. यापासून ना शेतकऱ्यांना खाण्यापुरती बाजरी मिळाली, ना जनावरांना चारा.

पाहणीकरून अहवाल सादर
याबाजरीची वाढ झाली नाही, जेवढी वाढ झाली तिलाही अधिकाधिक वांझ कणसं लागली, तर काही कणसांमध्ये थोडेच दाणे भरले. एकंदरीत बाजरीचा प्लॉट पाहिल्यावर पाखराने कणसं टोकल्यावर जशी दिसतात, त्या पद्धतीची ही बाजरी दिसत आहे. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ नॅशनल सीड्स कॉर्पाेरेशन या कंपनीच्या शास्त्रज्ञांना सोबत घेऊन पाहणी केली. या पाहणीचा अहवाल शासनाला पाठवला अाहे.

चारा आणि धान्य असे दोन उद्देश साध्य करणारे हे वाण असल्याचे कृषी विभाग आता सांगत आहे. मात्र, एकही उद्देश साध्य होत नाही. बाजरीची वाढ कमी आहे. त्यापासून किती चारा म्हणून किती सरमड निघणार आहे? ही एकप्रकारची फसवणूकच आहे. दामोदर घुगे,
धोनखेडा(ता.औरंगाबाद)

बोगस बियाणे देऊन शासनाने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. ज्या कंपनीकडून हे बियाणे घेऊन शेतकऱ्यांना दिले त्या नॅशनल सीड्स काॅर्पोरेशन या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. बाळासाहेब सानप, अध्यक्ष,जय भगवान महासंघ

मी शासनाकडूनमिळालेल्या बियाण्याच्या दोन बॅग पेरल्या. ते पूर्णपणे फेल गेले. आता त्यात जनावरे चारावी लागत आहेत. गेली तीन वर्षे पावसाच्या लहरीपणामुळे शेती पिकली नाही. आता या वर्षी पाऊस आहे, तर शासनाने बियाणे बोगस दिले. भागाजीघुगे, धोनखेडा(ता.औरंगाबाद)
शासनालाप्रात्यक्षिकचकरायचे होते, तर याबाबत आम्हाला कल्पना तरी द्यायची होती. आम्हाला माहिती असते तर चार-पाच एकरावर बाजरी पेरलीच नसती. दिवाळीला काही पोते बाजरी विकून वर्षभर खायला पुरेल, अशी अाशा होती. आता काहीच नाही. विशाल सांगळे, साताळा(ता. औरंगाबाद)

तुमचे झाले प्रात्यक्षिक...
शासनाचीच कंपनी, शासनाचाच विभाग, पण फसला तो शेतकरी. आरएचबी-१७७ वाणाची उत्पादकता कमी आहे, हे माहिती असूनदेखील कृषी विभागाने हे वाण शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. यातून शासन शेतकऱ्यांना नफ्याची शेती करायला सांगत आहे की तोट्याची? नेहमीप्रमाणे आता पाहणी होईल, अहवालांचा खेळ होईल अन् मंत्री नुकसान भरपाईपोटी दीडदमडी देण्याची घोषणा करतील. चांगल्या वाणाची बाजरी असेल तर खर्च वजा जाता शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये एकरी नफा मिळताे. ज्या शेतकऱ्यांनी या वाणाची बाजरी पेरली होती, त्यांचा खरीप हंगाम हातचा गेला आहे. नुकसान भरपाई घोषित करताना किमान याचा तरी विचार शासनाने केला पाहिजे. कारण हा कृषी विभागाचा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे.

काय आढळले तज्ज्ञांच्या पाहणीमध्ये
{बाजरीची वाढ खंुटलेली.
{ अधिकाधिक कणसं वांझ.
{ दाणे भरलेली कणसंही अर्धवट.
{ एकरी एक क्विंटल उत्पादनाची शक्यता.
थेट सवाल
के. व्ही. देशमुख, कृषी संचालक (गुणनियंत्रण), पुणे
एस. जी. पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
काय म्हणतात शेतकरी ?
जिल्ह्यात आठ हजार एकरांवर पेरणी, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना नगदी पिकाने दिला दगा; कृषी विभाग म्हणते ‘प्रात्यक्षिक’
कृषी विभागाने वाटप केलेल्या बियाण्याची उत्पादकता कमी आहे, हे माहिती असतानाही हे बियाणे शेतकऱ्यांना का वाटप केले?
आम्हालाकेंद्र शासनाकडून याबाबत सूचना येतात. प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना हे बियाणे वाटलेले आहे.
तुमच्यासाठीहे प्रात्यक्षिक झाले, पण शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेला, त्याचे काय?
असेकाही नाही. हवामान बदलाचा हा फटका आहे. खासगी कंपन्यांचेदेखील वाण असे फेल जातातच ना.
आताशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काय?
आतापुन्हा एकदा शास्त्रज्ञांमार्फत क्राॅप कटिंग एक्स्पेरिमेंट होईल. त्यातील तथ्य आपण शासनाला कळवू.
कृषी विभागाने खरीप हंगामामध्ये दिलेल्या बाजरीच्या बियाण्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत का?
हो.कणसं लागणे, कणसांमध्ये दाणे भरणे अशा तक्रारी आल्या आहेत.
तक्रारींनंतरकाय कार्यवाही केली?
शास्त्रज्ञांच्यापथकांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे. पाहणीचा अहवाल कृषी आयुक्त आणि नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या हेडक्वार्टरलाही पाठवला आहे.
कायआढळले पाहणीमध्ये?
वाढकमी असणे, कणसांमध्ये इतर वाणाच्या तुलनेत कमी दाणे भरणे आदी तथ्य आढळले आहेत. या वाणाची उत्पादकताच इतर खासगी वाणांच्या तुलनेत कमी आहे.
जरउत्पादकता कमी होती तर शेतकऱ्यांना ते बियाणे का वाटले?
हेप्रात्यक्षिक होते, कुठलीही योजना नव्हती.
बातम्या आणखी आहेत...