आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Department,Latest News In Divya Marathi

कृषी विभाग उभारणार हवामान केंद्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वीस गावांत मिळून एक याप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने राज्यात 2165 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव तयार झाला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधून पीक पद्धती ठरवणे शक्य होईल. याचबरोबर उद्भवणारी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळेल. स्थलनिहाय पडणारा पाऊस, थंडी व तापमानाची अचूक नोंद घेता येईल.
दिवसेंदिवस हवामानात अनपेक्षित बदल होत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो, तर काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाही. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक ते देशपातळीवरील अर्थव्यवस्थेवर होत आहे. ग्रामीण भागात स्थलनिहाय हवामानातील बदल टिपण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे लवकरच उभारण्यात येणार आहेत. कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रस्ताव तयार केला असून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मान्सूनपूर्व काही ठिकाणी केंद्रे बसवण्याची तयार केल्याची माहिती दांगट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
नागरिकांना मिळणार विजेची पूर्वसूचना दोन ते अर्धा तास आधी : भारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था, पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने औरंगाबादसह राज्यात वीस ठिकाणी आकाशातून वीज पडण्यापूर्वी सूचना देणारे ‘लायटनिंग लोकेशन नेटवर्क’ बसवण्यात आले आहे. एक तंत्रज्ञान 200 ते 250 कि.मी. अंतरावरील हवामान, वीज पडण्याची शक्यता याची माहिती देईल. पुणे येथील आयआयटीएम विभाग याची माहिती अर्धा ते दोन तास अगोदर हवामानशास्त्र, कर्मचारी व नागरिकांना एसएमएसद्वारे देणार आहे, अशी माहिती शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी दिली.