आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Department's Land To Be As Green Area

झाडांना हात लावता एकर जागेचा विकास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ५५ वर्षांचा भाडेकरार संपल्यावर कृषी विभागाकडून मनपाने परत मिळवलेल्या हिमायत बागेतील 1 एकर जागेवरील वनराईतील एक फांदीही छाटता चांगल्या कामांसाठी वापर केला जाईल, अशी ग्वाही महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिली आहे.

१९५९ मध्ये तत्कालीन नगरपालिकेने सरकारच्या कृषी विभागाला हिमायत बागेतील एकर जागा ५५ वर्षांच्या करारावर दिली होती. या कराराची मुदत या वर्षी संपली. त्यानंतर मनपाने कृषी विभागाशी पत्रव्यवहार करून ही जागा ताब्यात घेतली. गर्द वनराईने नटलेल्या या भूखंडावर येत्या आठवड्यात मनपा आपल्या मालकी हक्काबाबत ताबा घेतल्याबाबतचे फलक लावणार आहे. ही जागा मनपाच्या ताब्यात आल्यावर व्यावसायिक वापराचे इमले उभारण्यासाठी या जागेचा वापर केल्यास त्यावरील झाडांची माेठ्या प्रमाणावर तोड होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी वर्तवली होती. आज महापौर त्र्यंबक तुपे यांनी ही भीती निराधार असल्याचा निर्वाळा दिला. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी महापालिका या जागेचा चांगलाच वापर करणार आहे. या जागेचे आरक्षण तपासण्यात येणार असून येथील झाडी जशी आहे तशीच राहणार असून विकासाच्या नावाखाली झाडाची एकही फांदी छाटली जाणार नाही. आहे त्या स्थितीत नागरिकांच्या उपयोगी कोणता प्रकल्प राबवता येईल यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा उत्पन्न वाढवणार
शहराच्या विविध भागांत मनपाच्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत, त्यांचा वापर करून मनपाचे उत्पन्न वाढवणारे प्रकल्प घेण्याचा विचार असून याबाबत चाचपणी करून एक प्रस्ताव तयार केला जात आहे. शहराची गरज जागांना आलेले महत्त्व पाहता मनपाच्या या जागांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी हातभार लागू शकतो. काही ठिकाणी आरक्षण तपासून ते बदलता येईल का, हेही पाहण्याची गरज असल्याचे महापौर म्हणाले.