आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture News In Marathi, Political Party, Divya Marathi

जोडधंद्याला सवलतीत कर्ज द्या, पहिलीपासून शेती विषय शिकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. लवकरच रणशिंग फुंकले जाईल. रणधुमाळी आटोपली की नवे सरकार सत्तेवर येईल. या नव्या राज्यकर्त्यांकडून जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सर्व आवृत्तीक्षेत्रांत ‘टॉक शो’ आयोजित केले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मते यात जाणून घेतली जात आहेत. याच मालिकेत सर्वप्रथम शेतीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्यात आली. यात पुढे आलेले काही ठळक मुद्दे संक्षिप्त रूपात असे...
* जोडधंद्यांसाठी पीक कर्जाप्रमाणे
६ टक्के व्याजाने कर्ज द्यावे.
* शेती विषयाचा पहिलीपासून शिक्षणात समावेश करावा.
* त्रुटींचा आढावा घेऊन नव्या योजना अमलात आणाव्यात
* चार-पाच गावांचे क्लस्टर करून गटशेतीला चालना द्या.
* सहा तासच, पण दविसा वीज द्यावी. नवे तंत्रज्ञान शिकवावे.
* बीजोत्पादन गावातच व्हावे. िठबक िसंचन सक्तीचे करावे.
* शेअर बाजाराप्रमाणे शेतीसाठी कृषी नरि्देशांक असावा.
* उत्पादन होणाऱ्या पिकावर गावातच प्रक्रिया उद्योग हवेत.
* प्रयोगशाळा व मार्गदर्शन केंद्रे तालुका पातळीवर असावीत.
* फसवणाऱ्या ब‍ियाणे, खते कंपन्यांवर बंदी घालावी.
* शासकीय योजनांसाठी पेपरलेस कार्यपद्धती सुरू करावी.
* रोजगार हमी योजनेद्वारे शेती मशागतीची कामे करावीत.
* शालेय पोषण आहारात जळगावची केळी असावी.
* भौगोलिक स्थितीनुसार नियोजन, आराखडा सरकारने करावा.
* अवजारनिर्मितीस प्रोत्साहन, यांत्रिकीकरणास चालना द्यावी.
* फळे, भाजी वाहतुकीसाठी रेल्वेला कोल्ड स्टोरेज डबा जोडा.
* माती परीक्षणावर शेतक-याला सॉइल हेल्थ कार्ड देण्यात यावे.
* कृषी मूल्य आयोगावर थेट शेतक-याचे प्रतिनिधी हवेत.
* कृषी विद्यायापीठांकडून रिव्हिजिट संशोधन करण्यात यावे.
* स्कूल ऑफ एनर्जीकडून वीज स्वयंपूर्णतेचे प्रशिक्षण द्यावे.
* प्रत्येक जि.प. गटात स्वतंत्र शीतगृह उभारणी करा.
* कालव्यांतून पाणीवाटप धोरण बदलून पाइपद्वारे पाणी द्यावे.
* धरणांच्या पाण्याचे ऑडिट व्हावे.
* आयात निर्यातीचे निश्चित धोरण.
* शेतीत सरकारचा हस्तक्षेप नको.
* भ्रष्टाचारमुक्त पाणलोट योजना.
* पुरेशी वीज उपलब्ध करून द्या.
0६
ठिकाणी एकाच वेळी झाली चर्चा
१००
हून अधिक आल्या सूचना
८४ मान्यवरांचा चर्चेत सहभाग
शेतकरी, शेतीतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, बाजार समित्यांचे पदाधिकारी, कृषी व िसंचन खात्यातील अधिकारी, राजकीय पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी यांचा समावेश.