आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीने नियोजन केल्यास 44 कोटी लिटर पाणी मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जाधववाडी येथे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची 73.26 हेक्टर जमीन आहे. यापैकी मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन विभागाला 50 एकर जमीन देण्यात आली आहे. या सर्व क्षेत्रावर दरवर्षीच्या मान्सूनमध्ये 54 कोटी लिटर पावसाचे पाणी पडते. समिती प्रशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास 80 टक्के वाहून जाणारे 44 कोटी लिटर पाणी उपलब्ध होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जाधववाडीत 76.26 हेक्टरपैकी 30 हेक्टरवर बाजार समितीची प्रशासकीय इमारत, सभागृह, फळ व धान्यांचे गोदाम, धान्य, फळ, भाजीपाला, किराणा मार्केटच्या भव्य इमारती आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या सर्व इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, पण यापैकी एकाही इमारतीवर वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. त्यामुळे 44 कोटी लिटर पाणी नाल्याद्वारे वाहून जाते.
बाहेर पाणी जात नाही
इमारतीच्या छतावरून व बाजार समितीच्या आवारात पडणारे पावसाचे सर्व पाणी येथेच मुरते. कारण ठिकठिकाणी जमिनीला नैसर्गिक चढ-उतार आहेत. नाल्याद्वारे पाणी बाहेर काढून दिलेले नाही. विहीरही खोदलेली आहे. यामुळे सर्व पाणी जमिनीत मुरत असल्याने जलपुनर्भरण व विहिरीची जलपातळी उंचावण्यासाठी मदत होते. शासन नियमाप्रमाणे लवकरच रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
नानासाहेब अधाने, सचिव, बाजार समिती.