आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम नगरसेवकांचाही होणार ‘केआरए’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएममधील काही नगरसेवक वेगळ्याच अविर्भावात वागत आहेत. पक्षाचे आदेश पाळणे, बैठकांना दांडी मारणे अशा अनेक तक्रारी वाढल्या होत्या. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेत नगरसेवकांच्या प्रत्येक कामकाजाचा लेखाजोखा अर्थात केआरए तयार करण्याचे आदेश आमदार इम्तियाज जलील यांनी शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना दिले आहेत.
या केआरएवरूनच पुढील निवडणुकीत तिकीट वाटप करण्यात येणार आहे. यामुळे पक्षविरोधी कारवाया गटबाजी करणाऱ्या नगरसेवकांना चांगलेच महागात पडणार आहे. शहरात पक्षाचे २४ आणि स्वीकृत सदस्य असे २५ नगरसेवक आहेत. एमआयएममध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद वाढले आहेत.

याचा फटका नुकत्याच झालेल्या बुढीलेन वॉर्डातील पोटनिवडणुकीत बसला. पक्षाच्या नावावर सहज निवडून येऊ, असा अनेकांचा समज होता. या गैरसमजुतीमुळे बुढीलेन वाॅर्डात पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाच्या अनेक नगरसेवकांचे वागणे असभ्यपणाचे आहे. काही जण ठरवून पक्षाच्या विरोधात काम करत होते. वॉर्डातील समस्यांकडे दुर्लक्ष करून इतर विषयांत वेळ वाया घालवत होते. यामुळे पक्ष आमदार जलील यांची प्रतिमा खराब होत चालली होती. या सर्व गोष्टी गांभीर्याने घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आमदार इम्तियाज जलील यांना प्राप्त होताच त्यांनी शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना सूचना देत नगरसेवकांचा लेखाजोखा तयार करण्याचे आदेश दिले.

कामबघून तिकिटाचे वाटप
परवेज खानतक्रारीनंतरच निर्णय झाला
^नगरसेवकांचेकामकाज,त्यांचे वॉर्डातील नागरिकांशी उद्धटपणे वागणे याविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून लेखाजोखा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. -इम्तियाज जलील, आमदार

का घेतला निर्णय
नगरसेवकांचे वॉर्डातील नागरिकांशी, अधिकाऱ्यांशी वागणे योग्य नसल्याच्या तक्रारी होत्या. काही नगरसेवक पक्षाचे आदेश पाळत नाहीत. बैठकांना गैरहजर राहतात. नागरिक कामे घेऊन गेल्यास त्यांची दखल घेत नाहीत, अशा तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेल्या होत्या. त्यामुळे सर्व लेखाजोखा तयार करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...