आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार घालणार आता वाॅर्डांत लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - एमआयएमला मनपा पोटनिवडणुकीतील बुढीलेन वॉर्डाचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे तसेच पक्षाची घटती लोकप्रियता रोखण्यासाठी आमदार इम्तियाज जलील आता दर आठवड्याला दोन वॉर्डांत भेट देऊन नगरसेवकांच्या कामांची पाहणी करणार आहेत. या नवीन प्रयोगाला ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी नागरिकांना जाहीर सभेत वॉर्डाच्या विकासाची आश्वासने दिली होती. मात्र पक्षात अंतर्गत राजकारण वाढले आहे. नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डात म्हणावी तशी कामे झाली नाहीत. नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे पक्षाविषयी मोठी नाराजी पसरली आहे. याचाच फटका बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत बसला. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी नवीन प्रयोग राबवण्याच्या सूचना आमदार इम्तियाज जलील यांना केल्या आहेत. त्यानुसार ते वॉर्डाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. हा प्रयोग एमआयएम राबवत असल्यामुळे पक्षाच्याची ताकत वाढू शकते. असा होरा पक्षाच्या अध्यक्षांच्या असल्यामुळे ही पावले उचलण्यात आली आहे.

एमआयएमला पुढच्या निवडणुका सोप्या जाव्यात, यासाठी आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. चांगले काम केल्यास लोक पुन्हा मतदान करतील यासाठी आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. यास नगरसेवकांकडून प्रतिसाद मिळाला तरच ते पक्षासाठी फायद्याचे ठरू शकते.

दोन वॉर्डांचे काम बघणार
^ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून दोन वॉर्डांचे कामकाज बघणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवण्यात येईल. -इम्तियाज जलील, आमदार
बातम्या आणखी आहेत...