आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: मुंबई 1174 तर 2075 रुपयांत दिल्लीचा विमानप्रवास, एअर इंडियाची मान्सून ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारताची राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने पावसाळ्यातील प्रवासासाठी खास मान्सून ऑफर जाहीर केली असून याअंतर्गत औरंंगाबाद ते मुंबई प्रवासाचे तिकीट अवघ्या ११७४ रुपयांत, तर दिल्लीचे तिकीट २०७५ रुपयांत उपलब्ध होईल. यासाठी २१ जूनपर्यंत बुकिंग करावी लागणार असून २० सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येईल. बुकिंगसाठी बुधवार अखेरचा दिवस आहे. 

एअर इंडियाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात सावन स्पेशल अॉफर जाहीर केली जाते. याअंतर्गत विमान प्रवासाचे तिकिटाचे दर अर्ध्याहून कमीवर येतात. यंदा मान्सून ऑफरसाठीची बुकिंग १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. बुधवार, २१ जून बुुकिंगचा अखेरचा दिवस आहे. या योजनेत जुलै ते २० सप्टेंबरदरम्यान प्रवास करता येईल. यासाठी देशांतर्गत विमान प्रवासाचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट मूळ दर अवघ्या ७०६ रुपयांपासून सुरू होत आहेत. अौरंगाबादहून एअर इंडियाचे एक विमान दिल्ली, तर एक मुंंबईला जाते. मान्सून ऑफरमध्ये यासाठी अर्ध्यापेक्षा कमी दर मोजावे लागतील. 

मान्सून ऑफरमध्ये औरंगाबाद ते मुंबईसाठी ११७४ रुपयांत तिकीट 
१५२९ मंुबई परतीचा प्रवास 
२०७५ दिल्लीच्या प्रवासासाठी जाताना 
२०६० दिल्लीहून परतीचा प्रवास 
५० %सूट 

६० वर्षांवरील नागरिकांना तिकिटाच्या बेसिक दरात 
या दरात सर्व करांचा समावेश असेल अशी माहिती एअर इंंडियाचे स्टेशन मॅनेजर रमेश नंदे यांनी दिली. यासाठी २१ जूनपर्यंत बुकिंग करता येईल, असे नंदे म्हणाले. 

ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सूट 
पूर्वी ६३ वर्षांवरील नागरिकांसाठी ही सूट हाेती. मे महिन्यापासून हे वय ६० वर्षांवर आणण्यात आले आहे. एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रवासासाठी इकॉनॉमी क्लाससाठी ही ऑफर कायमसाठी उपलब्ध असेल. याचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना वयाचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा कोणत्याही राष्ट्रीय संस्थेने दिलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 
बातम्या आणखी आहेत...