आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेड कार्पेट अंथरूनही औरंगाबादेत विमान कंपन्यांचा ठेंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादहून देश-विदेशातील शहरांना जोडण्यासाठी अधून-मधून नवीन विमानांची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात परदेशी तर दूर देशी विमान कंपन्यांही येथे सेवा पुरवण्यास तयार नाहीत. विमानतळ प्राधिकरण या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र त्यास यश मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांत प्राधिकरणाने तब्बल एअरलाइन्स कंपन्यांना औरंगाबाद आणि परिसराचे महत्त्व पटवणारे २५ कलमी पत्र धाडले. पण कोणी यास उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवले नाही. यामुळे औरंगाबादकरांना जगभराशी एअर कनेक्टिव्हिटी हा विषय सध्या तरी स्वप्नरंजनच ठरणार आहे.
ऐतिहासिक, पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे तसेच आशियातील जलदगतीने वाढणारे औद्योगिक शहर असा औरंगाबादचा गौरव आहे. यामुळे औरंगाबादचा देशातील तसेच जगभरातील महत्त्वांच्या शहरांशी हवाई संपर्क व्हावा, अशी अनेकांना गरज वाटते. अधूनमधून तशा आशयाच्या बातम्या आल्यामुळे शहरवासीयांना दिलासा वाटताे. परंतु गेल्या काही वर्षांतील इतिहास बघता नवीन विमान तर दूर, आहे त्याच सेवा बंद होत गेल्या आहेत. मात्र, शहराची नवनवीन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे विमानपत्तन निदेशक आलोक वार्ष्णेय प्रयत्न करत आहेत. पण त्यास प्रतिसाद मिळत नाही.

प्रयत्न करत राहणार
^औरंगाबादेत विमान कंपन्यांना व्यवसायाची भरपूर संधी आहे. मुळातच औरंगाबादचा विचार करताना संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला पाहिजे. सेवा सुरू झाली तर त्यास संपूर्ण विभागातून प्रतिसाद मिळेल. हेच पटवून देण्यासाठी विविध कंपन्यांना पत्र पाठवले. त्यांचा प्रतिसाद आला नसला तरी माझे प्रयत्न सुरू राहणार आहेत. आलोकवार्ष्णेय, विमानपत्तन निदेशक

महिन्यांत कंपन्यांना संपर्क
वार्ष्णेय यांनी जुलै २०१५ मध्ये विमानळाची सूत्रे स्वीकारली. सुरुवातीचे काही महिने शहराचा अभ्यास केल्यावर त्यांना येथे देशी-परदेशी हवाई सेवेला मोठी संधी असल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांनी जानेवारी २०१६ पासून कंपन्यांना औरंगाबादची महती सांगणारे पत्र पाठवण्यास सुरुवात केली. यात एअर एशिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर कोस्टा, टाटांचे एअर विस्तारा, गो एअर, एअर पिगेसस, ब्ल्यू डार्ट या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांना औरंगाबाद आणि परिसराची भागौलिक, औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक, तांत्रिक माहिती, औरंगाबादमध्ये होणारे महोत्सव, चर्चासत्रे, सेमिनार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महती सांगणारे २५ कलमी असे तीन पानी पत्र पाठवले. यात छायाचित्रांचाही समावेश आहे. परंतु आजवर यावर एकाही कंपनीने यास प्रतिसाद दिलेला नाही. एकूणच औरंगाबादहून सेवा सुरू करण्यात या कंपन्यांना रस नसल्याचेच दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...