आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Airports In The Area 150 Dangerous Buildings On Marking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळ परिसरातील दीडशे धोकादायक इमारतींवर मार्किंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चिकलठाणा विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत परिसरात नियमांचे उल्लंघन करून इमारतींचे बांधकाम झाले आहे. अनेक इमारतींची उंची िवमानतळ प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा अधिक आहे.
विमानाचे टेक ऑफ लँडिंगदरम्यान या इमारतींपासून धोका होऊ शकतो. यामुळे विमानतळ प्रशासनाने म्हाडा, सिडको, चिकलठाणा परिसरातील इमारतींचे सर्वेक्षण करून मार्किंग केली आहे. यात दीडशेपेक्षा अधिक इमारतींचा समावेश आहे. महापालिका, विमानतळ पोलिस प्रशासनाच्या वतीने लवकरच या भागातील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. त्यादृष्टीने विकास आराखडा तयार केला जात आहे. शेंद्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
मराठवाड्यातील शेतीला चालना देण्यासाठी कार्गो विमान सेवा सुरू होत आहे. जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे, उद्योग, रोजगाराला चालना देण्यासाठी देश-विदेशातील विविध राज्याला विमान सेवेने जोडण्याचे प्रयत्न होत आहेत. शिवाय औरंगाबादेत विमानाची नाइट पार्किंग सेवा सुरू करण्याविषयी केंद्रीय उड्डयण मंत्री अशोक पुसापती यांनी सूतोवाच केले होते. त्यामुळे विमानांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. या सर्व कारणांमुळे चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने परिसरातील धाेकादायक इमारती पाडण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांिगतले.

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले
गतदोन वर्षांपासून विमानतळ संरक्षक भिंत परिसरात विमान प्राधिकरण, मनपाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काही लोकांनी उंच इमारती बांधल्या आहेत. भिंतीला बऱ्याच ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यातून मोकाट कुत्रे धावपट्टीवर येतात. शिवाय येथे टाकण्यात येणारे शिळे अन्न, मांस, कचऱ्यामुळे उंदीर, कीटकांचे प्रमाण वाढले आहे. हे भक्ष्य खाण्यासाठी पक्षी मोठ्या संख्येने येतात. पक्ष्यामुळे दोन वेळा विमानाचा मोठा अपघात होता होता टळला. काही वर्षांत या परिसरात उंच इमारतींची संख्या वाढतच गेली. यापासून विमानांना धोका आहे. या सर्व गोष्टी भविष्यातील विमान सेवेच्या विकासाला बाधक ठरणार आहे. हे ओळखून उंच इमारती, अतिक्रमण हटवण्यासाठी विमान प्रशासनाच्या वतीने स्थापत्य अभियंते, विमानतळ पोलिसांच्या टीमने नुकतेच सर्वेक्षण करून दीडशेपेक्षा अधिक इमारतींवर मार्किंग केली. काही जणांना नोटिसा पाठवल्याने या परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

सुरक्षेकडे दुर्लक्ष : विमानतळावरकडक सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र ही सुरक्षा केवळ इमारतीपुरती मर्यादित असल्याचे संरक्षक भिंत, आसपासच्या उंच इमारतीवर गेल्यानंतर कळते. विमानाला सहज लक्ष्य करता येईल, अशी स्थिती आहे. दहशतवादाचे मोठे संकट असूनही याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

कारवाई लवकरच
विमानतळपरिसरात नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका पोलिस प्रशासनाच्या मदतीने लवकरच कारवाई करण्यात येईल. अलोकवार्ष्णेव, विमानतळ निदेशक.