आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणींच्या प्रतिकृती ओस; प्रवेश नि:शुल्क तरी पर्यटक फिरकेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर - अजिंठा लेणी विकास योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून फर्दापूर टी पॉइंट येथे उभारण्यात आलेल्या अजिंठा लेणी अभ्यागत केंद्राची अवस्था ‘पांढरा हत्ती पोसायला भारी’ अशी झाली आहे. या अभ्यागत केंद्राकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने हा प्रकल्प शोभेची वस्तू ठरतो आहे.

फर्दापूर येथे अजिंठा लेणींच्या प्रतिकृती असलेले अभ्यागत केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री चिरंजीवी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2013 मध्ये झाले. त्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते.
या अभ्यागत केंद्रात अजिंठा लेणीच्या लेणी क्र. 1, 2, 16 व 17 च्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी अभ्यागत केंद्रात लिफ्ट, स्वयंचलित पायर्‍या, वातानुकूलित म्युझियम, एन. पी. थिएटर, दोन उपाहारगृहे, शॉपिंग प्लाझा, अजिंठा लेणीतील धबधब्याप्रमाणे कृत्रिम धबधबा, सुसज्ज वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी झालेल्या उद्घाटनानंतर हे अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी विनामूल्य खुले करण्यात आले आहे. नि:शुल्क प्रवेश असूनही या अभ्यागत केंद्राकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे हे विशेष. या ठिकाणी येणारे पर्यटक थेट अजिंठा लेणीच पाहणे पसंत करत असल्याचे दिसत आहे.

या केंद्राचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेदेखील अद्याप ताबा घेतलेला नाही. परिणामी, अभ्यागत केंद्र उभारणीचे काँटॅÑक्ट घेणार्‍या एल अँड टी कंपनीलाच या अभ्यागत केंद्राची सध्या देखभाल करावी लागत असून येथील यंत्रणेवर दररोज होणारा हजारो रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याने या केंद्राची अवस्था एखादा पांढरा हत्ती पोसल्यासारखी झाली आहे. त्यामुळे केंद्र म्हणजे शोभेची वस्तू बनलीय.

कंत्राट एल अँड टी कंपनीला
अजिंठा लेणी अभ्यागत केंद्र हे एल अँड टी कंपनीला चालवण्यास दिले आहे. असे फर्दापूर टी पॉइंट येथील एमटीडीसीचे व्यवस्थापक विष्णू आग्रे यांनी सांगितले.