आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा घाटात पुन्हा अपघात; टेम्पो दरीत कोसळला; 5 जण जखमी, कठडे नसल्याने अपघातांची मालिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून  शनिवारी अजिंठा घाटात झालेल्या अपघातामुळे तब्बल १० तास वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटनेनंतरच रविवारी (दि. ६) मध्यरात्रीच्या सुमारास अजिंठा घाटातील पहिल्याच वळणावर आयशर आणि मालट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहने खोल दरीत कोसळली. यात टेम्पो ५० फुटांवर अडकला, तर ट्रक शंभर फूट खोल दरीत गेला. या अपघातात पाच जण जखमी झाले.  

देवगाव रंगारी येथून संत्रा घेऊन गुजरातकडे जाणारा मालट्रक (एमपी-०६-एचसी १७११) औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटातून रात्री १ वाजेच्या सुमारास पहिल्या वळणावरून जात असताना समोरून गुजरातहून बांगड्यांचे बॉक्स घेऊन घाट चढत असलेला टेम्पो (जीपी-८०-सी-४१६४) यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहने दरीत कोसळली.   

पाच जण बचावले.. अपघात रविवारी रात्री दीड वाजता झाला. घाटातून रात्री काही जण अजिंठ्याकडे येत होते. त्यांनी अपघाताची माहिती अजिंठा बसस्थानकवर दिली. ग्रामस्थांनी एवढ्या रात्री फौजदार अर्जुन चौधरसह शंभर  फूट दरीत उतरून जखमींना बाहेर काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  

वेळ आली पण... सदर घटनेत टेम्पो पन्नास, तर मालट्रक शंभर फूट दरीत कोसळला. तरी दोन्ही वाहनांतील सर्व जण वाचले. दोन्ही वाहनांतील एक- दोन वगळता बाकीचे बेशुद्ध होते. सर्वांवर अजिंठा ग्रामीणचे डॉ. राघव दवंगे, रवी नागरे, बबलू यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी औरंगाबादला पाठवले. रुग्णालयात नोंदणीनुसार मोहंमद शमशुद्दिन, जोगिंदर सिंग, मुजीब, कासिम अशी जखमींची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...