आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा ग्रामपंचायत होणार ‘हायटेक’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - अजिंठा येथील ग्रामपंचायतीत संगणक आला असून आता फक्त ब्रॉडबँडची प्रतीक्षा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचा सगळा कारभार संगणकावरून ऑनलाइन होणार आहे. बटन क्लिक करा माहिती ताबडतोब मिळवा ही हायटेक प्रणाली होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षाचे धूळ खात पडलेल्या रेकॉर्डचे रजिस्टर शोधण्याचे काम संपणार आहे.
राज्यशासनाने प्रत्येक ग्रामपंचायत संगणीकृत करण्याचे योजलेले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत एक संगणक, ब्रॉड बँड कनेक्शन आणि एक ऑपरेटर राहणार आहे. या संगणकामुळे ग्रामपंचायतीचा कारभार थेट राज्यशासनाची जोडला जाणार आहे. घरपट्टी, नळपट्टी, ग्रामपंचायतीचा ठेका, करवसुली उद्दिष्ट साध्य झालेले हेतू, ग्रामपंचायतीला आलेला निधी, केलेली कामे ही सर्व माहिती संगणकात डेटा स्वरूपात असणार आहे. कोणाला माहिती हवी असल्यास संगणकावर नाव टाकून सगळी माहिती लगेच ती उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाचे जीआर, विविध योजना लगेच या संगणकांवर उपलब्ध होणार असून ती माहिती त्वरित मिळणार आहे.
रजिस्टर होणार हद्दपार - ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षाचे रेकॉर्ड हे रजिस्टरमध्ये नोंदवलेले असायचे. एखादी माहिती काढायची असल्यास त्या वर्षाचे रजिस्टर शोधले जायचे. धूळ झटकून माहिती दिली जात असे. यासाठी खूप वेळ लागत असे व त्रासही होत असे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने हे काम आता क्लिक बटनावर आले आहे. संगणकाचे बटन क्लिक केल्याबरोबर काही मिनिटांत पाहिजे असणारी माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
ब्रॉड बँडची प्रतीक्षा - ग्रामपंचायतीला संगणक आला आहे. जोडणीही झाली आहे. फक्त ब्रॉड बँड कनेक्शन येण्याचे बाकी आहे. नंतर ग्रामपंचायतीची सगळी कामे ऑनलाइन होणार आहे. - डी. जे. बोराडे, ग्रामसेवक, अजिंठा