आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अजिंठ्याचा अस्तंगत होणारा खजिना या अवलियाने कॅनव्‍हासवर चितारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो वर्षांपूर्वी अज्ञात महान कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती. जागतिक वारसा आणि जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र.. भारतीय प्राचीन कलेचा अनमोल ठेवा असलेल्या अजिंठय़ातील चित्रकृती.. काळाच्या ओघात या कलाकृतीचा र्‍हास होत आहे.पण 50 वर्षांपूर्वी अजिंठाच्या सर्व कलाकृती याची देही याची डोळा पाहणार्‍या मारुतराव पिंपरे यांनी त्यातील अनेक चित्रे जशीच्या तशी कॅनव्हासवर रेखाटलीत. या अवलियाने 400 ते 500 चित्रे रेखाटून अजिंठा चित्रांमध्ये पुन्हा रंग भरले आहेत.

औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरात राहणारे मारुतराव पिंपरे अजिंठा आर्टिस्ट म्हणून सुपरिचित आहेत. सहावीच्या वर्गात असताना सहलीवेळी अजिंठा पाहिलेल्या पिंपरेंच्या मनावर तेथील चित्रकलेचा एवढा प्रभाव पडला की ते या चित्रांच्या प्रेमात पडले. कलेच्या प्रेमापोटी त्यांनी अजिंठय़ामधील शेकडो चित्रांची पुनर्निर्मिती केली. यात एक फुटापासून 65 फुटांपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे. इसवीसन पूर्व 450 वर्षांपूर्वी रेखाटलेल्या चित्रासारख्या 500 पेक्षा जास्त स्वत: चितारलेल्या चित्रांचा खजिना पिंपरे यांनी जोपासला आहे.