आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दी उतरवून आता अजिंठा पोलिस शाळा-कॉलेजात, विद्यार्थ्यांना देताय प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- पोलिस प्रशासन आता भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी मैदानावर उतरले असून शाळा- महाविद्यालयांत जाऊन थेट प्रशिक्षण देत आहेत. यात सपाेनि शंकर शिंदे हे स्वत: मैदानात वर्दी उतरवून लांब उडी तसेच विविध कसरती करून दाखवत असल्याने मुलींसह विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. अनेक जण या मोहिमेमुळे पोलिस प्रशासनाकडे आकर्षित होत आहेत. मुलांच्या मनामधील स्पर्धा परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न असल्याने पोलिस सांगतात.

पोलिस स्थापन दिवस सर्वत्र साजरा केला जातो. सर्व ठाण्यांत पोलिस शस्त्रांची विद्यार्थ्यांना माहिती देतात. मात्र, अजिंठा पोलिस यावर्षीचा पोलिस सप्ताह कायम स्मरणात राहावा म्हणून शाळा, काॅलेजच्या मैदानात वर्दी उतरवून अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. शाळेत, महाविद्यालयांत दिवसभर मैदानावर कसरती करून घाम गाळत आहेत.

सपाेनि शंकर शिंदे, गुन्हे शाखेचे नाईक अजित शेकडे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारीही प्रशिक्षण देत आहेत. ग्रामीण भागातील मुलांनी मोठ्या संख्येने पोलिस दलात यावे यासाठी पोलिस प्रयत्नशील असून त्या दृष्टीने प्रयतन सुरू आहे.

६२ जणांचे रक्तदान
अजिंठापोलिस ठाण्यात मंगळवारी आयोेजित रक्तदान शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत महाजन उपस्थित होते.

३०० मुलांचाही सहभाग
२०० मुलींनी घेतला प्रशिक्षणात लाभ
५०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
४८ पोलिस हद्दीत गावे

स्पर्धा परीक्षांची भीती दूर करू
जेविद्यार्थी शहरात जाऊन मोठ्या प्रशिक्षणवर्गात प्रवेश घेतात तेच विद्यार्थी पोलिसांत भरती होतात, असा ग्रामीण विद्यार्थ्यांचा समज आहे. हा गैरसमज दूर व्हावा म्हणून अाम्ही स्वत: शाळा- महाविद्यालयांत जाऊन प्रशिक्षण देत आहोत.
- शंकर शिंदे, सपोनि, अजिंठा ठाणे

लांब उडीसह पुलअप्स
प्रशिक्षणात पोलिस लांब उडी, पुलअप्स, धावणे, लेखी परीक्षा, तसेच थाेडक्यात मुलाखती, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच अधिकाऱ्यांची भाषणेही होत आहेत.