आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची भटकंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळदरी - वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी  वनविभागाने  ठिकठिकाणी कृत्रिम १० पाणवठे तयार केले  होते. मात्र वाढत्या उन्हामुळे हे पाणवठे आजघडीला कोरडेठाक पडले आहेत. हे पाणवठे आजघडीला नुसती शोभेची वस्तू बनली आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच मिळत नसल्याने हे प्राणी पाण्याच्या शोधात भटकताना दिसून येत आहेत.  

या वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने वन्य प्राणी, मुके जीव पाण्यावाचून तडफडत आहेत. त्यातच  पुरेसे खाद्यही मिळत नसल्याने वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. वन्य प्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून प्राण्यांसाठी पाण्याची पर्यायी  व्यवस्था  करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी  होत आहे.  

अजिंठा वन परिक्षेत्रातील  पाणी टंचाई कायमची आहे. यामुळे वन्य जीवांना स्थलांतर करावे लागते. या भागात काही नैसर्गिंक पाण्याचे स्रोतही आहेत. मात्र हे पाणवठे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच कोरडेठाक पडत चालले आहे. वानरांसह इतर  प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने  परिसरातील गाव, वस्तीकडे  धाव घेतली आहेत.  
 
पिंपळदरी, वसई, गावांच्या सभोवताली  अजिंठा लेणीच्या  डोंगररांगा आहेत. घनदाट  जंगलाने  वेढलेल्या या  परिसरातील  नागरिकांना  वन्य प्राण्यांचे क्वचितच दर्शन घडते. परंतु आता हरीण,तडस,मोर, पक्षीसह  वन्य प्राण्यांनी  मुख्यत: वानरांनी  परिसरातील वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. 

खेड्यांतील विहिरींवर पाणी पिण्यासाठी  वानरांचे  टोळके दृष्टीस  पडत आहे.   मात्र हे वानर गावातील घरांच्या  छतावर उड्या मारून  पत्रांची नासधूस करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ  हैराण झाले आहेत.  
बातम्या आणखी आहेत...