आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन हजारच्या नवीन नाेटांवर अजिंठा लेणीतील चित्रांचा साज, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - माेदी सरकारने हजार, पाचशेच्या नाेटा बंद केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने काढलेली दाेन हजारांची नाेट सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनली अाहे. उच्चस्तरीय सुरक्षेचा विचार करून तयार करण्यात अालेली ही नाेट रंगरूपानेही तितकीच सुंदर अाहे. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील काही भित्तिचित्रांच्या प्रतिकृतीही या नाेटेवर मुद्रित करण्यात अाल्या अाहेत.
गुलाबी रंगाच्या या नाेटेवर गांधीजींचा फोटो मध्यभागी घेण्यात आला आहे, तर मागील बाजूस मंगलयानाची प्रतिकृती छापण्यात आली आहे. त्या खालोखाल अजिंठा लेणीतील तीन भित्तिचित्रांची प्रतिकृती सलगपणे छापण्यात अाली अाहे. हत्ती, मोर आणि कमळाचे फूल अशी ही चित्रे आहेत. ही चित्रे लेणीमधील सभामंडपाच्या छतावर काढलेली आहेत.
युनाेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केलेली अजिंठा लेणी जगभरातील पर्यटकांचे अाकर्षण अाहे. जपानसह अनेक देशांतील पर्यटक दरवर्षी या लेणीला भेट देत असतात. या लेणींमध्ये भिंतीवर साकारण्यात अालेली चित्रे पर्यटकांना भुरळ पाडतात. यापैकीच काही चित्रे अाता दाेन हजार रुपयांच्या नव्या नाेटांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांसाेबत राहणार अाहेत. यातून वेळाेवेळी अजिंठा लेणीतील चित्रांचे दर्शन घडत राहील.
फाॅर्म अजिंठाचाच
^दाेन हजार रुपयांच्या नव्या नोटांवरील ही चित्रे अजिंठा चित्रशैलीवरूनच घेतलेली आहेत. ती एकदम हुबेहूब जरी नसली तरी त्यांचा फॉर्म हा अजिंठा चित्रशैलीचाच आहे.
दिलीप बडे, ज्येष्ठ चित्रकार व अाैरंगाबाद शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य.
पुढील स्लाईडवर पाहा, अजिंठा लेणीमधील विविध चित्र
बातम्या आणखी आहेत...