आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळात मोठा अनर्थ टळला; वेरूळ लेणीच्या डोंगरास आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ लेणीच्या डोंगरास लागलेली आग - Divya Marathi
वेरूळ लेणीच्या डोंगरास लागलेली आग
औरंगाबाद - महामार्गावर वायर तुटून पडली, वाहतूक ठप्प
औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा बसस्थानक रस्त्यावरून गावात जाणारी मुख्य विद्युत वायर सायंकाळी सव्वासात वाजता संरक्षण वायर नसल्याने महामार्गावर तुटून पडली. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत दोन्ही बाजूंची वाहने थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर येथे दोन वायरमनने तुटलेली वायर बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला. यामुळे बसस्थानक परिसरात वीज गुल झाली होती. 

वेरूळ लेणीच्या डोंगरास आग; कर्मचाऱ्यांनी विझवली 
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ लेणीच्या डोंगरात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला होता, परंतु लेणी प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने पुढील मोठा धोका टळला. लेणी क्र. १० च्या वरील बाजूस लागलेल्या या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले होते. ही आग लेणी क्र. १० कडून हवेच्या जोराने लेणी क्र. १६ च्या दिशेने निघाली होती.   
बातम्या आणखी आहेत...