आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजापाठ, हार, फुलांशिवाय अजिंठा लेणीत भरते दरवर्षी यात्रा, पिढ्या न पिढ्यांपासून सक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी दूरवरून नागरिक देतात लेणीला भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यात्रा म्हटली तर पूजा पाठ, हार-फुल, मंत्रोच्चार,भंडारा आलाच. आयोजक, संयोजकांशिवाय तर यात्रा अशक्यच. परंतु अजिंठ्यात भरणाऱ्या एका यात्रेत या सर्व बाबी कोठेच नाहीत. दरवर्षी संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी अजिंठा लेणीतच पूर्वापारपासून ही यात्रा भरत आहे. एक दिवसाच्या यात्रेसाठी सर्वच जाती धर्माचे भाविक दूरवरून येतात. 

अजिंठा लेणीत भरणाऱ्या या यात्रेविषयी कोणाला फारशी माहिती नाही. यात्रा कधीपासून सुरू झाली, याची माहितीही उपलब्ध नाही. मात्र, पिढ्या पिढ्यापासून सक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रेची परंपरा आहे. 

तिकीट काढून यात्रा : लेणीप्रवेशासाठी सर्वांनाच तिकीट काढावे लागते. या मंडळींना तेथील कलाकृतीत फार रस नसला तरी लेणीविषयीची आपुलकीच त्यांना येथे घेऊन येते. यामुळेच येथे पूजापाठ, हळदी, कुंक पान, हार वाहणे असे प्रकार हाेत नाहीत. यात्रेसाठी कोणी आयोजक, संयोजकही नसतात. 

मोठा बाजार : टीपॉईंट आणि व्ह्यू पॉईंटवर मोठा बाजार भरतो. दोन्ही ठिकाणी साधारणपणे २५० ते ३०० दुकाने लागतात. यात रेवडी आणि गुळाच्या जिलेबीला खास मागणी असते. भांडे, खेळणी, कपडे, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची बाजारात रेलचेल असते. पूर्वी लेणी पायथ्याशीच बाजार भरायचा. भाविक बैलगाड्या करून येथे यायचे. लेणीसमोर सोबत आणलेला डबा खायचे, अशी माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे निवृत्त संचालक, इतिहासाचे अभ्यासक डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली. 

अजिंठा यात्रेचे दशकाचे वारकरी : डॉ.पी.डी.पाटील यांचा अजिंठ्याच्या या यात्रेवर मोठा अभ्यास आहे. डॉ.पाटील यांचे शिक्षण औरंगाबादेत झाले. विद्यापीठात डॉ.पंढरीनाथ रानडे यांच्याकडे त्यांनी १९८५ मध्ये पीएचडीसाठी नोंदणी केली. मात्र, रानडे यांनी त्यांना पीएचडी पूर्वी अजिंठ्या संबंधीच्या लेखनाचे समीक्षण या विषयात एमफील करण्यास सांगीतले. यासाठी त्यांनी प्रश्नावली तयार केली. यात अजिंठ्यात एखादी यात्रा भरते का असा प्रश्न होता. जवळपास सर्वच उत्तरदात्यांनी यास हो उत्तर दिले. यावर चकित झालेले डॉ.रानडे यांनी पाटील यांना यात्रेची माहिती घेण्यास सांगीतले. पुढे रानडे आणि पाटील यात्रेच्या दिवशी ‘अजिंठा यात्रा महोत्सवातून’ लेणीबाबत प्रबोधन आणि अन्य सामाजिक कार्य करू लागले. अजिंठा फ्रेंड्स क्लबच्या माध्यमातूनही येथे विविध उपक्रम सुरू केले. ते २९ वर्षांपासून चुकता यात्रेला जात आहेत. 
 
अनोख्या यात्रेतून समाधान 
अजिंठ्यातील बौद्धलेणीने विद्यार्थी दशेपासून मला वेड लावले. या विषयातच एमफील आणि पीएचडी केल्याने इथले शिल्प, चित्र आणि स्थापत्य कलेतून तथागतांचे तत्वज्ञान समजण्यास मदत झाली. यात्रेची माहिती झाली. यामुळे गेल्या २९ वर्षांपासून चुकता सक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या यात्रेला जात आहे. यातून वेगळेच समाधान मिळते - डॉ.पी.डी.जगताप, इतिहासाचे अभ्यासक.