आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्याला पर्यटकांची प्रतीक्षा; स्वतंत्र सांस्कृतिक महोत्सव घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू केली असली तरी या निर्णयावर अजिंठ्यातील पर्यटन व्यावसायिक नाराज आहेत. हा महोत्सव अजिंठ्यात घ्यावा, अशी मागणी अजिंठ्यातील पर्यटन व्यावसायकांनी केली आहे. वेरूळपेक्षा अजिंठा लेणीच्या प्रचाराची अधिक गरज अाहे, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाने वेरूळ-औरंगाबाद महोत्सव घेण्याचे जाहीर केले आहे.
विद्यापीठ परिसरातील सोनेरी महालात रंगणाऱ्या या महोत्सवाचे काही सादरीकरण वेरूळ येथे व्हावे, असेही नियोजन आहे. मात्र, हा महोत्सव अजिंठ्यात व्हावा यासाठी अजिंठ्यातील पर्यटन व्यावसायकांनी कंबर कसली आहे. अजिंठा हॉटेल्स पर्यटन विकास क्लस्टर समूह, फर्दापूर या संघटनेने यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेटही घेतली.
अजिंठ्यातच का?
अजिंठा हॉटेल्स पर्यटन विकास क्लस्टर समूहाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या मते, ताजी आकडेवारी पाहता वेरूळच्या तुलनेत अजिंठ्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचे मुख्य कारण औरंगाबादपासूनचे जास्त अंतर आणि खराब रस्ते हे आहे. तसेच प्रसिद्धीच्या बाबतीतही अजिंठा कमी पडते. त्या तुलनेत औरंगाबादपासून जवळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने वेरूळ येथे जातात. अजिंठ्यात पर्यटकच नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी हा महोत्सव अजिंठ्यात आयोजित करावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. अजिंठ्यात सांस्कृतिक महोत्सव घेतल्यास येथे पर्यटकांची संख्या वाढेल. या काळात पर्यटकांना निवास व्यवस्थेत ५० टक्के सूट देण्याची तयारी व्यावसायकांनी दर्शवली आहे. अजिंठ्यातील अजिंठा व्हिजिटर्स सेंटरमध्ये महोत्सव आयोजित केल्यास सहकार्य करण्याची ग्वाही व्यावसायकांनी दिली आहे.

^दिवसेंदिवस अजिंठ्यातीलपर्यटकांची संख्या रोडावत आहे. ती वाढावी यासाठी वेरूळ महोत्सव अजिंठ्यात घेणे हा नामी उपाय ठरू शकतो. यासाठी प्रशासनाला सहकार्य करू. -राहुलदेव निकम, अध्यक्ष, अजिंठा गाइड्स असोसिएशन

^अजिंठ्याच्या ब्रँडिंगसाठीवेरूळ महोत्सव मोठी संधी आहे. या काळात पर्यटकांना निवास व्यवस्थेत ५० टक्के सूट देऊ. यातून अन्य व्यवसायांनाही चालना मिळेल. -संजय सोनवणे, अध्यक्ष, अजिंठा हॉटेल्स पर्यटन विकास क्लस्टर समूह
बातम्या आणखी आहेत...