आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी कोणाचेही घर फोडले नाही - अजित पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - खासदार गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू तथा आमदार धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे आणि सहकारी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या कार्यक्रमासाठी अजित पवार आज परळीत दाखल झाले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. मुंडेनी अजित पवार हे घर फोडण्याचे काम करत आहेत असा आरोप केला होता. त्यावर अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले की मी कोणाचेही घर फोडत नाहीये, माझ्या पक्षासाठी मी काम करत आहे. काही दिवसापूर्वी गोपीनाथ मुंडे भाजप सोडून दुसर्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरु होती त्यावेळेस ते काय करत होते, असा प्रश्न अजित दादांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. सर्व नाराज कार्कार्त्यांसाठी राष्ट्रवादी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असे त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
अजितदादांचे भोजन धनंजय मुंडेंच्या घरी!
परळीत सभापतिपदी पंडितराव मुंडे बिनविरोध
घराणेशाहीत गैर ते काय? गोपीनाथ मुंडे यांचा सवाल!