आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AK 47, Stenagana, Karbaina Seeing The Gun Astonish Students

एके -47, स्टेनगन, कार्बाइन गन पाहून विद्यार्थी थक्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिनेमात नायकाच्या हातात दिसणारी विविध शस्त्रे प्रत्यक्षात पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित प्रदर्शनात बुलेट प्रूफ जॅकेट, स्टेनगन, एके -47, 1 बोअर, टू बोअर, कार्बाइन गन यासह अनेक शस्त्रे पाहून विद्यार्थी थक्क झाले.प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (2 जानेवारी) सकाळी 11 वाजता पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते झाले. उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी, विजय पवार, के. एस. बहुरे, सुखदेव चौगुले यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांची उपस्थिती होती. शहरातील 27 शाळांमधील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या शस्त्रांची माहिती जाणून घेतली.

पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 2 ते 8 जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


मुख्यालयाच्या परिसरात अति व शीघ्र कृतिदल तसेच मुख्यालयातील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शन भरवले आहे. 8 जानेवारीपर्यंत नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन खुले राहील. बिनतारी संदेश वाहक यंत्रणा, वॉकी टॉकी, ट्रान्समीटर यंत्रणा, बॉम्ब सूट, एक्सोसिव्ह डिटेक्टर, रिमोट वायर कटर, जमिनीच्या आतील किंवा पाण्याच्या आतील धातूंचा शोध घेण्यासाठी वापरले जाणारे डीएसएमडी, एक्स्टेंशन मिरर, प्रोडर वायर अँड केबल लोकेटर (सुरुंग शोधण्यासाठी), बॉम्ब ब्लँकेट, बॉम्ब बास्केट आदी साहित्य प्रदर्शनात आहे. या प्रदर्शनात यंदा न्यायवैद्यक शाळेच्या विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे महिला अत्याचाराविषयीची तर सायबर क्राइमच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

अशी आहे प्रदर्शनातील शस्त्रे
या प्रदर्शनात बुलेट प्रूफ जॅकेट, स्टेनगन, एके -47, 1 बोअर, टू बोअर, कार्बाइन गन, 5 एमएम व 9 एमएम पिस्टल, धर्मार, बाराबोर, पॉइंट 22 गन, 3 नॉट 3 रायफल, मस्केट, एसएलआर गन, लाइट मशीन गन, एमटीएस सबमशीन गन, पिस्टल रिव्हॉल्व्हर लामा, पिस्टल रिव्हॉल्व्हर एस अँड डब्ल्यू, पिस्टल अ‍ॅटो 9 एमएम, पिस्टल ब्लॉक 9 एमएम, विविध हातकड्या, दोरी, गॅस गन, एअर स्मोक ग्रेनाइट, अँटी राइट गन अशी शस्त्रे या प्रदर्शनात आहेत.