आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार : अकबरुद्दीन ओवेसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रक्षोभक वक्तव्यांमुळे देशभरात प्रसिद्धीस आलेले एमआयएमचे (मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन) आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी नोटीस देण्यासाठी आलेल्या पोलिसांना सुभेदारी विश्रामगृहावर तीन तास ताटकळत ठेवले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे अकबरुद्दीन यांनी सांगितले.

रमजानच्या शुभेच्छा देण्यासाठी अकबरुद्दीन सकाळी आठ वाजता सुभेदारी विश्रामगृहात आले. तेव्हाच त्यांनी मी कुणालाही भेटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे 11 वाजता सुभेदारीवर आले. मात्र त्यांनाही अकबरुद्दीन यांनी दोन वाजेपर्यंत ताटकळत ठेवले. सव्वादोनच्या सुमारास पोलिसांनी ओवेसींची भेट घेऊन सभा घेणार नाही, समाजातील वातावरण बिघडेल अशी कुठलेही वक्तव्य करणार नाही. अशी नोटीस दिली. तीन वाजता ते खुलताबादकडे रवाना झाले. सायंकाळी व्हीआयपी फंक्शन हॉलमध्ये त्यांनी इफ्तार पार्टीलाही हजेरी लावली.