आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: 4 लाख 77 हजार मतदार बजावणार हक्क, 94 मतदान केंद्र संवेदनशील, तगडा पोलिस बंदोबस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गेल्या १२ दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ५७९ उमेदवार मैदानात प्रचारासाठी फिरत होते, तर २१ फेब्रुवारीला मतदार राजा मैदानात उतरून या उमेदवारांबाबत निर्णय घेणार आहे. महापालिका निवडणुकीत एकूण चार लाख ७७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी ५८७ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रासह मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मतदान जवळ आल्याने उमेदवारांची प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठीसाठी धावपळ होत असून, आता काय होणार? या चिंतने उमेदवारांच्या मनात हुरहुर निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक विभागाने शहरात एकूण ५८७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी १५७ मतदान केंद्र अधिक आहेत, तर एका मतदान केंद्रावर सरासरी ८०० मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे. महापालिकेची हद्द वाढ झाल्याने मतदारांची संख्या चार लाख ७७ हजार ४१२ आहे. 
यासाठी एकूण ५८७ मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राधिकारी, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई त्याच बरोबर पोलिस असे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्या प्रमाणे एका प्रभागात दोन झोनल अधिकारी असे ८० तसेच पाच झोनल अधिकारी रिझर्व्ह नियुक्त केले आहेत. त्यामुळे २६०० पोलिंग ऑफिसर, १७० परदा नसिन आणि ५५० चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे एकूण तीन हजार ३६५ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहेत. 

दरम्यान, २० फेब्रुवारीला दुपारी दोन नंतर अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. २१ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत मतदान करता येणार आहे. पोलिसांनी अतिसंवेदनशील, संवेदनशील मतदान केंद्र घोषित असल्याचे घोषित केले. या अनुषंगाने केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ५७९ उमेदवारांचे भविष्य आज सिलबंद होईल. २३ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. 

पोलिसांनी मतदान केंद्र अतिसंवेदनशील, ९४ केंद्र संवेदनशील असल्याचे घोषित केले. सर्वात अधिक अतिसंवेदनशील केंद्र खदान ठाण्यांतर्गत येतात, तर डाबकी रोड ठाणे जुने शहर ठाण्यांतर्गत प्रत्येकी दोन केंद्र अतिसंवेदनशील आहेत, तर सर्वाधिक संवेदनशील केंद्र अकोट फैलमध्ये ३१, सिव्हिल लाइन ठाण्यांतर्गत १४, खदान ८, डाबकी रोड ६, एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत ६, कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 

लाख ३१ हजार महिला मतदार 
एकूण मतदारांची संख्या लाख ७७ हजार ४७२ आहे. यात लाख ३१ हजार १०१ महिला मतदार, लाख ४६ हजार ३४८ पुरुष २३ मतदार इतर आहेत, तर ५७९ उमेदवारांपैकी २६३ महिला उमेदवार आहेत. 

सर्वाधिक मतदान केंद्र प्रभाग १० मध्ये 
प्रभाग क्र. ची मतदार संख्या २९, ६५६, १० ची २९, ४४५ आहे. त्यामुळे येथे प्रत्येकी ३६ मतदान केंद्र, तर सर्वात कमी मतदान केंद्र प्रभाग मध्ये २० आहेत. या प्रभागात सर्वात कमी मतदारांची संख्या १६ हजार २९६ आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा प्रभाग निहाय मतदान केंद्राची संख्या अशी... 
बातम्या आणखी आहेत...