आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गारखेड्यातील अलंकार बालोद्यान उजळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्टारच्या स्वच्छता अभियानाने भारावलेल्या अलंकार सोसायटीतील नागरिकांनी स्वत: हातात झाडू घेत आपला परिसर आणि ‘अलंकार बालोद्यान’ स्वच्छ केले. लहान चिमुकल्यांपासून ते युवक आणि वृद्धांपर्यंत तमाम पुरुष व महिला मंडळ या अभियानात सहभागी झाले होते. उद्यान जुगा-यांचा अड्डा बनले होते. स्वच्छतेसाठी नागरिकांच्या पुढाकार पाहून या भागातील पोलिस निरीक्षक जयकुमार चके्र यांनीही बीट माश्रलच्या कर्मचा-यांना उद्यानात तीन वेळा गस्त घालण्याचे आदेश दिले. शिवाय गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आसपासच्या काही दुकानदारांनाही तंबी देत समजावून सांगितले.
गारखेडा परिसरातील अलंकार सोसायटीत तत्कालीन मनपा आयुक्त डी. एन. वैद्य यांच्या काळात 18 वर्षांपूर्वी 20 लाख रुपये खर्च करून ‘अलंकार बालोद्यान’ विकसित करण्यात आले. मात्र, उद्यान विभागाच्या दुर्लक्षित कारभाराने हे उद्यान बकाल झाले. कच-याचे ढीग आणि दुर्गंधी तसेच उद्यानात चाललेल्या गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते.


हे झाले सहभागी
डीबी स्टारच्या स्वच्छता अभियानामुळे भारावलेले जागरूक युवक आणि महिला मंडळ एकत्र आले आणि त्यांनी स्वत: अलंकार उद्यान स्वच्छ केले. या अभियानात विशालनगर परिसरातील हिंदवी विकास महासंघाचे विश्वासराव येवले पाटील, मनीष मगर, अक्षयराजे ताठे, सुनील पाचपुते, राहुल इंगळे, गणेश मगर, गोपाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, धर्मराज कु-हे, सचिन मगर आणि अलंकार सोसायटीतील लता वाघचौरे, रूपाली पिंगळे, संगीता तोंडे, सुनंदा डाफणे, स्वाती मेहेत्रे, श्रद्धा वाघचौरे, कीर्ती लड्डा, आशा मोहिते, अश्विनी कुलकर्णी, संगीता ब्रह्मपूरकर, लता जगताप, लता नागे या आदी महिला सहभागी झाल्या होत्या.


पोलिसांचीही मदत : परिसरात गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे यांना नागरिकांनी गैरप्रकारांबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ बीट मार्शलच्या कर्मचा-यांना
उद्यानात तीन वेळा गस्त घालण्याच्या सूचना केल्या.