आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी शिवणगाव येथे ग्रामपंचायतीवर काढला मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना:( कुंभार पिंपळगाव ) गावातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील मौजे शिवणगाव येथील महिलांनी बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. दारू बंद करण्याच्या मागणीने गाव दणाणून सोडले. 
 
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव गावाची लोकसंख्या दोन हजार ३०० आहे. गावात अवैध दारू विक्री होत असल्याने ती बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांना दोनशे महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात अाले. परंतु दोन महिने होऊनही गावातील अवैध दारू विक्री बंद झाली नाही. गावात अवैध दारू विक्री होत असल्याने गावात व्यसनाधीन नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. 
 
गावात तळीरामांची संख्या वाढल्याने महिला मुलींना रस्त्याने चालणे कठीण होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीला गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले.
 
ग्रामस्थांच्या वतीने घनसावंगी पोलिसांनादेखील निवेदन देण्यात आले; परंतु गावातील अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचे ठरविले. 
 
गावात अनेक महिला बचत गट असून त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. गाव तंटामुक्त समिती ग्रामपंचायत यांनी दारू बंद करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी गावातून मोठा मोर्चा काढला. 
दारू बंदी केल्यास गावात ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले. गाव पातळीवर महिलांचा दारूबंदीच्या मागणीसाठी मोर्चा निघण्याची तालुक्यातील पहिलीच वेळ आहे. या मोर्चामध्ये महिलासह शाळकरी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
 
गावात दारूबंदी करणाच्या मागणीचे निवेदन यशवंत मित्र मंडळ यांनी केले. निवेदनावर प्रतिभा तौर, मंगला मुळे, गंभीरा साबळे, अरूणा तौर, सत्यशिला तौर, ज्योती तौर, मिरा तौर, शोभा तौर, पद्माबाई तौर, कुसुम तौर, शारदा तौर, उषा तौर, सुमित्रा तौर, देशमुख यांच्यासह ५० ते १०० महिलांच्या स्वाक्षऱ्यां आहेत. या महिलांनी यापूर्वीही जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केलेली आहे. 
 
निवेदन दिले कारवाईकेली जाणार 
- शिवण गावात अवैधदारू विक्री करणाऱ्या योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी एक पथक ही तालुक्यासाठी तयार करण्यात येणार आहे. गावातील अवैध विक्री पूर्णपणे बंद करण्यात येईल. 
-संजय लोहकरे, पोलिस निरीक्षक, घनसावंगी 
निवेदन दिले 
गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी पोलिस प्रशासन ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने अखेर गावात महिलांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. अवैध दारू विक्रीमुळे गावात तळीरामांची संख्या वाढल्याने महिलांना गावातून फिरणे कठीण होत आहे.
-उषा मोरे, ग्रामस्थ, शिवणगाव. 

दोन महिन्यांनंतरही कार्यवाही नाही
 गावात अवैध दारू विक्री होत असल्याने ती बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांना दोन महिन्यांपूर्वी जवळपास दोनशे महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात अाले. त्यानंतरही गावातील अवैध दारू विक्री बंद झाली नाही.
 
गावात अवैध दारू विक्री होत असल्याने गावात व्यसनाधीन नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. गावात तळीरामांची संख्या वाढल्याने महिला मुलींना रस्त्याने चालणे कठीण होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणीही महिलांनी केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...