आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alienist Dr. Rajendra Barve, Latest News In Divya Marathi

मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ द्या, मोकळे वाढू द्या, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुलांवर संस्कार करणे आणि त्यांना घडवणे ही पालकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यांना सांभाळताना वाढेल तसे वाढू द्या असे होऊ नये तसेच अति काळजीच्या चौकटीतही मुलांना वाढवू नये. मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ द्या. त्यांना मोकळे आकाश अनुभवू द्या. असे करताना त्यांची काळजीदेखील घ्या, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दिला.

ओंकार विद्यालय आणि मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या वतीने ह्यपालक-बालक संवाद आणि परिणामह्ण या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तापडिया नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात पुण्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ओंकारच्या मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे यांची उपस्थिती होती. डॉ. बर्वे म्हणाले, पालकांचा मुलांसोबत होणारा संवाद त्यांच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा ठरतो. बाबांच्या हातातून सुटताच त्यांच्या हाती मोबाइल येतो. जाणिवा जागृत होण्याच्या वयामध्ये मोबाइल मुलांवर संस्कार करू लागतो. मुले मोबाइलचा वापर कशासाठी करतात याकडे आपण लक्ष द्यायला हवे. डॉ. वाटवे म्हणाले, महिला नोकरी करत असल्याने मुले घरात एकटी राहतात. त्यांच्या लक्षणांवर नजर ठेवून योग्य प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अर्चना नरसापूर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती देशपांडे यांनी आभार मानले.
संवादाचे प्रत्यक्ष सादरीकरण
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ललिता बर्वे, डॉ. राधिका शर्मा आणि डॉ. अनिकेत कुलकर्णी यांनी संवादांचे प्रयोग सादर केले. मुलगा खेळण्यासाठी मैदानावर जाऊ का? असे विचारतो. तेव्हा रागीट आई - वडील, दोष देणारे आई - वडील आणि पंडित आई - वडील कसा प्रतिसाद देतात, त्याचा मुलावर काय परिणाम होतो हे दाखवण्यात आले. यानंतर मानसोपचारतज्ज्ञ कसे समुपदेशन करतात याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.